घरपावसाळी अधिवेशन 2023अपघातग्रस्तांच्या आर्थिक मदतीवरून भास्कर जाधवांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...

अपघातग्रस्तांच्या आर्थिक मदतीवरून भास्कर जाधवांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

Subscribe

भास्कर जाधव यांनी अपघातग्रस्तांच्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील अपघातग्रस्त कुटुंबियांना सरकारकडून मदत दिली न गेल्याने त्यांनी सरकारला फैलावर घेतले. हे सरकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असे म्हणत भास्कर जाधव यांनी रोष व्यक्त केला.

Maharashtra Monsoon Session 2023 : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला काल (ता. 17 जुलै) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही सभागृहात लोकप्रतिनिधींकडून जनसामन्यांचे प्रश्न विधिमंडळात उपस्थित करण्यात येत आहे. परंतु आज (ता. 18 जुलै) विधानसभेत ठाकरे गटाचे गुहागरमधील आमदार भास्कर जाधव हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भास्कर जाधव यांनी अपघातग्रस्तांच्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील अपघातग्रस्त कुटुंबियांना सरकारकडून मदत दिली न गेल्याने त्यांनी सरकारला फैलावर घेतले. हे सरकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असे म्हणत भास्कर जाधव यांनी रोष व्यक्त केला. (Bhaskar Jadhav attacked the government over the financial assistance of the accident victims)

हेही वाचा – 26 पक्ष एकत्र आल्यामुळे…; विरोधकांच्या बैठकीतून मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर केला हल्लाबोल

- Advertisement -

याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गावर गुहागर मतदारसंघातल्या एका जाधव कुटुंबातल्या माणसाच्या गाडीचा अपघात झाला. कंत्राटदारामुळे हा अपघात झाला. 2011 साली या रस्त्याचे काम सुरू झाले, पण अजूनपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही म्हणून अपघात झाला. एका घरातली, एका गावातली 10 माणसं जागेवर गेली. आम्ही तिथे गेलो, तेव्हा एका चितेवर सात प्रेतं ठेवलेली होती.

गेल्या अधिवेशनात मी राहुल नार्वेकरांना त्यांच्या चेंबरमध्ये भेटायला गेलो. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना विनंती केली की राजकारणासाठी तुम्ही आमचे विकासाचे पैसे थांबवलेत. पण एका कुटुंबातली 10 माणसे मेली, त्यांना काहीतरी मदत करा. तेव्हा एकनाथ शिंदेंनी सांगितले की भास्करराव, आम्ही मदत करतो. पण खासगी वाहनात त्यांचा अपघात झाल्यामुळे मदत होईल की नाही ते पाहावे लागेल म्हणून मला सांगितले, अशी माहिती भास्कर जाधव यांनी सभागृहात दिली.

- Advertisement -

या घटनेबाबतची माहिती देताना भास्कर जाधव सरकारवर रोष व्यक्त करत म्हणाले की, पुण्याला बेंजो पार्टी गेली, तिथे 13 माणसे अपघातात गेली. त्यांना मदत केली. आप्पासाहेब धर्माधिकारींच्या पुरस्कार वितरणात 14 माणसे गेली, त्यांना मदत केली. समृद्धी महामार्गावर 25 माणसे अपघातात मेली, त्यांना मदत केली. 15 दिवसांपूर्वी दापोली तालुक्यात 8 माणसे खासगी गाडीतच अपघातात गेली, त्यांनाही मदत केली. पण गुहागरमधली माणसे माझ्या मतदारसंघातली होती. त्यांना मदत केली गेली नाही. सात माणसांना एका चितेवर अग्नी दिला. हे सरकार आहे की कोण आहे? इतके तुम्ही निर्दयी झालात? खरंतर तुमच्याबद्दल दुसरा शब्द वापरला पाहिजे, असे म्हणत जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

एवढे तुम्ही निष्ठुर झालात? आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर राहिलो, म्हणून तुम्ही त्या लोकांना एक रुपयाची मदत करत नाही असा आरोप देखील भास्कर जाधव यांच्याकडून करण्यात आला. कुठे फेडणार आहात ही पापं? निर्लज्जपणाचा कळस आहे. चार चार वेळा मी भेटलो. तेव्हा उदय सामंतांनी मला मेसेज पाठवला की आपण ताबडतोब त्यांना मदत करतोय. त्यानंतर त्या लोकांना मदत केली, असेही भास्कर जाधव यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

प्रस्तावात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांचा उल्लेख आहे. त्या लोकांना आर्थिक मदत करावी आणि चूक करणाऱ्याला शिक्षा करावी असं म्हटलंय. मदत व्हायलाच हवी. कार्यकर्त्यांसाठी तळमळणारा नेता अशा भावनेतून आम्ही एकनाथ शिंदेंकडे बघतो. पण त्यांच्यातही राजकारण किती भिनलंय याचं उदाहरण सांगतो, याबाबतचे उदाहरण देत भास्कर जाधव यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या किस्स्याची माहिती सभागृहात दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -