घरमहाराष्ट्रकाही मंत्र्यांकडून भुजबळांना टार्गेट केले जातेय; प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

काही मंत्र्यांकडून भुजबळांना टार्गेट केले जातेय; प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप

Subscribe

यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध आहे. त्याला आमचा विरोध आहे आणि सुरू राहील.

मुंबई : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र उभे राहत असताना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातीलच काही मंत्र्याकडून टार्गेट केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते बुधवारी (8 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलत होते. (Bhujbal is being targeted by some ministers A serious charge of Prakash Shendge)

यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध आहे. त्याला आमचा विरोध आहे आणि सुरू राहील. एवढेच नाही तर आता गावोगावी मुख्यध्यापकांकडून जात प्रमाणपत्रांवर सरसकट पेनाने मराठ्यापुढे कुणबी म्हणून लिहले जात आहे. याला आमचा विरोध आहे. शिंदे समितीला असा कुठलाही अधिकार नाही. तर समितीने नोंदी शोधणे आणि त्यांना प्रमाणपत्र देणे असे कुठेही घटनेत नमूद नाही. देशात कालेलकर कमिशन, मंडल कमिशन नेमलेले आहेत. आणि या कमिशनच्या माध्यमातून कुठल्या जाती मागासलेल्या आणि कुठल्या नाहीत याचे सर्वेक्षण झालेले आहे. आता कितीवेळा सर्वेक्षण करणार आहात असा प्रश्न विचारतच शेंडगे यांनी सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा सांगितले की, मराठा समाज हा मागसलेला नाही. यापूर्वीच मराठा आरक्षणाचा पोपट मेलेला आहे. त्यामध्ये काही उरलेले नाही. एकतर ईडब्ल्यूएस घ्या किंवा वाढवून घ्या. असे केल्यावर हा वाद मिटेल. असेसुद्धा यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : वर्ष उलटले तरीही भाव वाढीची प्रतीक्षा; शेतकऱ्यांचं पांढरं सोनं घरातच पडून, दिवाळी अंधारात…

अन्यथा ओबीसींना रस्त्यावर उतरावे लागणार

यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, आता ते म्हणतात की, आमची संख्या 32 टक्के आहे. त्यामध्ये कुणबी मराठा आहे, मराठा कुणबी आहे. लेवा पाटीदार आहे आणि लेवा पाटील आणि मराठा अशा जाती आहेत. असे मिळून ते 32 टक्के आहे. त्यामधून जर मग आता हे वजा केले तर मराठा समाज राहला किती? आणि ते आरक्षण घेतायेत किती? सरकार त्यांच्या बाजूने आहे मग आता त्यांनी सामंजस्यांची भूमिका घेणे गरजेचे आहे. तेव्हाच यातून मार्ग निघेल. आणि जर सरकारने सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ओबीसीत घुसवले तर मग ओबीसींना रस्त्यावर उतरावे लागणार, यानंतर आमची लढाई मग रस्त्यावरची लढाई असणार आहे. असाही इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला.

- Advertisement -

हेही वाचा : नितीश कुमारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर महिला आयोग ACTION मोडवर; विधानसभा अध्यक्षांना नोटीस

भुजबळ सत्तेत असो वा नसो आम्ही त्यांच्या पाठीमागे

यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, छगन भुजबळ यांची आम्ही भेट घेतली. ते एकमेव असे नेते आहेत की, ते आमच्यासाठी लढतायेत. आणि त्यांना टार्गेट करण्याचे काम मंत्रिमंडळातीलच काही मंत्री करत आहे. त्यांना मराठा समाज तर विरोध करतच होता आता त्यांचेच सहकारी त्यांना टार्गेट करत आहेत. त्यांनी कोणती भूमिका मांडली, जी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली, अजित पवारांनी माडंली तीच भूमिका भुजबळ यांनीही मांडली. सगळ्या पक्षांच्या नेत्यांनीही तीच भूमिका मांडली. परंतू त्यांना टार्गेट का केले जाते हे मला कळत नाही. त्यांच्या पाठीमागे आम्ही असणार आहोत ते सत्तेत असो वा नसो असे म्हणत आम्हाला (OBC) ना कमी समजू नका, आम्ही धनदांडगे नाही, आम्ही रस्त्यावर उतरून लाठ्या काठ्याची लढाई करणार नाही परंतू मतपेटींतून आम्ही आमची लढाई नक्कीच करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -