घरमहाराष्ट्रतानसा अभयारण्यात दुर्मिळ 'वन पिंगळ्याचे' आकर्षण!

तानसा अभयारण्यात दुर्मिळ ‘वन पिंगळ्याचे’ आकर्षण!

Subscribe

वन पिंगळा' म्हणून ओळख असलेली घुबडाची एक दुर्मिळ प्रजात येथे पक्षी निरक्षकांना सध्या भुरळ घालत आहे.

महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फनसाड, पेंच, या अभयारण्यांन पाठोपाठ तानसा अभयारण्य पक्षी निरीक्षक व निसर्ग प्रेंमीच्या पसंतीस उतरलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मेळघाट व नंदुरबारच्या जंगलात आढलेले दुर्मिळ घुबड तानसाच्या जंगलात पक्षी निरिक्षकांना आढळून आले आहे. ‘वन पिंगळा’ म्हणून ओळख असलेली घुबडाची एक दुर्मिळ प्रजात येथे पक्षी निरक्षकांना सध्या भुरळ घालत आहे. तानसात वन पिंगळाच्या सर्वंधनाचे काम येथील वन्यजीव विभाग व पक्षीनिरीक्षक रोहीदास डगळे  यांनी आता हाती घेतले आहे. ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याच्या ३२० चौरस किलोमीटर आभयाण्याच्या क्षेत्र आहे यात तानसा, खडी, वाडा, परळी, सुर्यमाळ असे विस्तिर्ण अभायारण्य आहे. तानसाच्या  जंगलात एकुण २१२ पक्ष्यांच्या विविध प्रजाती आढळतात. त्यातील ५५ पक्षी तानसा तलावाच्या आसऱ्यावर राहत आहेत यात झाडावर वास्तव्य करणारे १२६ पक्षी आहेत असे तानसा वन्यजीव विभागातुन सांगण्यात आले आहे. सध्या हिवाळ्याच्या मौसमात पक्षी दर्शनासाठी पक्षीनिरीक्षक व निसर्गप्रेमी पर्यटकांच्या गर्दीने सध्या तानसा आभयारण्य गजबजुन गेल्याचे चित्र दिसत आहे.
तानसा तलाव व आजुबाजूला असलेल्या घनदाट जंगलातील दुर्मिळ पक्षी हिवाळ्याच्या पक्षी निरीक्षकांना रोज नजरेस पडत आहेत. तानसाच्या जंगलात वेगवेगळ्या रंगाचे पक्षी सध्या पक्षीनिरीक्षक व निसर्ग प्रेमींना साद घालत आहेत. तानसा अभयारण्यात हिवाळ्याच्या मोसमात देशी व परदेशी पक्षी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर येथे संचार करताना आढळतात. पावसाळ्यात पूर्व आफ्रीका देशातून भारतात येणारा स्थलांतरीत पक्षी चातक येथे आढळतो. सध्या हिवाळ्या मौसमातील पक्षी  तानसा आभयारण्यात येणाऱ्या पक्षी निरीक्षक निसर्ग प्रेमी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तानसाच्या घनदाट जंगलात पावश्या , भृंगराज ,कोतवाल ,कोकीळ ,हळदया ,नाचन ,घुबड , पिंगळ्या ,खारीक टक्कोचोर ,सुतार ,टिटवी खंड्या ,दयाळ ,लाव्हे , तिथर ,शिकरा, धोबी , पित्ता ,गरुड ,घार ,सादबहीणी ,करकोचा ,पोपट ,मोर आदि विविध पक्षी आढळून येतात. त्यामुळे हे पक्षी न्याहाळण्यासाठी पक्षी निरीक्षकांसह निसर्गप्रेमींच्या वाटा तानसा आभयारण्याकडे वळत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -