घरताज्या घडामोडीचित्रा वाघ यांना कुचिक बलात्कार प्रकरण भोवणार, महिला आयोगाकडून कारवाईचे संकेत

चित्रा वाघ यांना कुचिक बलात्कार प्रकरण भोवणार, महिला आयोगाकडून कारवाईचे संकेत

Subscribe

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाघ यांनीच मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास भाग पाडले असे या पीडितेने म्हटले आहे . यामुळे तिच्या मदतीसाठी आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघच अडचणीत आल्या आहेत. कारण पीडितेच्या आरोपांची दखल महिला आयोगाने घेतली असून वाघ यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडितेच्या आरोपाची दखल घेतली आहे. याबद्दल एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना त्या म्हणाल्या की महाराष्ट्राच्या राजकारणात ,समाजकारणात जे काही घडतंय ते दुर्देवी आहे. महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचं हे षडयंत्र रचल जात आहे. यामुळे यंत्रणाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. भाजप दररोज सकाळी स्क्रिप्ट तयार करतं. त्यानंतर दिवसभर ती वाचून नाट्य केली जातात.  तसेच याप्रकरणी मी पीडितेची भेट घेणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले असून तिने सविस्तर माहिती दिल्यानंतर वाघ यांच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले होते. चित्रा वाघ यांनी पीडितेची बाजू लावून धरली होती. तसेच याप्रकरणानंतर पुन्हा एकदा त्यांनी मविका सरकारवर हल्लाबोल केला होता. पण आता संबंधित तरुणीने वाघ यांनी आपल्यावर दबाव टाकला आणि पोलीस जबाबात त्यांच्यावर आरोप करण्यास लावले. तसेच मोबाईलमधून अॅपमधून मेसेज पाठवले. नंतर मला गोव्यात डांबून ठेवल्याचे गंभीर आरोप तिने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -