घरमहाराष्ट्रनाशिकमुक्त विद्यापीठास ‘नॅक’चे ‘ए’ नामांकन

मुक्त विद्यापीठास ‘नॅक’चे ‘ए’ नामांकन

Subscribe

६ ते ८ एप्रिल दरम्यान नॅक समितीने दिली होती विद्यापीठाला भेट

नाशिक : ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास ‘नॅक’तर्फे ‘ए’ नामांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठास हा बहुमान मिळाला असून ‘नॅक’ समितीने विद्यापीठास काही दुरुस्ती सुचवल्या आहेत. मुक्त विद्यापीठाने 2014 पासून ‘नॅक’ मूल्यांकन प्रक्रियेस सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर विद्यापीठाच्या नावलौकिकात सातत्याने भर पडत गेली. एप्रिल 2022 मध्ये ‘नॅक’ समितीने विद्यापीठातील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. 70 टक्के बाबींची ऑनलाईन पडताळणी केली. तसेच दि.6 ते 8 एप्रिल 2022 रोजी नॅक समितीने विद्यापीठास प्रत्यक्ष भेट दिली. विविध विद्याशाखा, पायाभूत सुविधांची पाहणी करत अखेर या समितीने मुक्त विद्यापीठास ‘ए’ मूल्याकन बहाल केले आहे. त्याचे प्रमाणपत्र लवकरच विद्यापीठास प्राप्त होणार आहे.

म्हणून नामांकन घसरले

मुक्त विद्यापीठाने अनेक वर्षांपासून पूर्णवेळ कर्मचारी भरती केलेली नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांची संख्या तुलनेत कमी दिसते. तसेच येथील प्राध्यापक संधोधन करत नसल्याचा ठपका ‘नॅक’समितीने ठेवला आणि इतर विद्यापीठांच्या तुलनेत प्राध्यापकांची संख्याही कमी असल्याचे ‘नॅक’ने म्हटले. त्यामुळे विद्यापीठास ए प्लस प्लस नामांकन मिळण्याची अपेक्षा असताना ‘ए’ नामांकन मिळाले.

- Advertisement -

विद्यापीठातील कर्मचार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे विद्यापीठास ’ए’ नामांकन मिळाले, त्याचा विशेष आनंद आहे. विद्यापीठास भेट दिल्यानंतर नॅक कमिटीने काही त्रृटी निदर्शनास आणून दिल्या. त्या दुरुस्त केल्यानंतर विद्यापीठा ए प्लस प्लस नामांकन मिळाले असते.
– प्रा.ई.वायूनंदन, माजी कुलगुरु, मुक्त विद्यापीठ

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -