घरताज्या घडामोडीकिरीट सोमय्यांच्या मुलाला 14 महिन्यांतच पीएचडी पदवी! चर्चेला उधाण

किरीट सोमय्यांच्या मुलाला 14 महिन्यांतच पीएचडी पदवी! चर्चेला उधाण

Subscribe

महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारे किरीट सोमय्या नेहमीच चर्चेत असतात. तसेच, किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यांपासून मविआ सरकारवर टीका करण्यात आघाडीवर आहेत. अशातच आता त्यांचा मुलगा नील सोमय्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारे किरीट सोमय्या नेहमीच चर्चेत असतात. तसेच, किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यांपासून मविआ सरकारवर टीका करण्यात आघाडीवर आहेत. अशातच आता त्यांचा मुलगा नील सोमय्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. किरीट सोमया यांच्या मुलागा केवळ 14 महिन्यातच पीएचडीची पदवी बहाल करण्यात आली आहे. मात्र, नील सोमय्या यांना मिळालेली पीएचडीची पदवी यावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच, याप्रकरणी आता तक्रारही दाखल करण्यात आली आहे. (Bjp Kirit Somaiya Son Neil Somaiya Awarded Phd In Just 14 Months Mumbai)

मुंबई विद्यापीठाची पीएचडी पदवी

- Advertisement -

नील सोमय्या यांना नुकताच मुंबई विद्यापीठाची पीएचडी पदवी देण्यात आली. पीएच.डी. पदवी मिळाल्याबाबचत नील सोमय्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर नील सोमय्या यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र, त्यांच्या पीएचडीच्या प्रमाणपत्रावरील तारीख पाहता विद्यापीठाने नील यांना 14 महिन्यांत पदवी दिल्याने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रमाणपत्रावर त्यांनी 1 जानेवारी 2021 रोजी नोंदणी केली होती. त्यानंतर 17 ऑगस्ट 2022 रोजी पूर्ण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Neil Somaiya (@neilsomaiya)

नील सोमय्या यांना 14 महिन्यांत मिळालेल्या पीएचडी प्रकरणी आता विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार ही पदवी खूप कमी वेळात देण्यात आल्याची तक्रार कुलगुरूंकडे दाखल करण्यात आली आहे. परंतु, नील सोमय्या यांना विद्यापीठ नियमानुसारच पीएचडीची पदवी प्रदान करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण त्यांचे मार्गदर्शक व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी दिले.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटकातील हिजाबबंदी : सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता, सुनावणी त्रिसदस्यीय पीठाकडे वर्ग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -