घरमहाराष्ट्रनाशिकचित्रा वाघ यांना निनावी पत्र; झेडपीत धावाधाव

चित्रा वाघ यांना निनावी पत्र; झेडपीत धावाधाव

Subscribe

नाशिक : सुरगाणा पंचायत समितीमधील लेखाधिकार्‍याचे निवृत्ती वेतन अडवल्याच्या कारणास्तव साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांना थेट जिल्हा परिषदेत धाव घ्यावी लागल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे निनावी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनीही बुधवारी शोधाशोध केली. त्यांच्या चौकशीमागील कारणे शोधताना अधिकार्‍यांची चांगलीच धावाधाव झाली.

कामाच्या ठिकाणी आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याची निनावी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट नाशिक जिल्हा परिषदेस भेट देवून माहिती घेतली. मात्र, त्यांच्याकडे त्रोटक माहिती असल्यामुळे कर्मचार्‍यांना त्यांचे समाधान करता आलेले नाही. कामाच्या ठिकाणी महिलांना त्रास देणे हा कायद्याने गुन्हा समजला जातो. वरिष्ठांविरोधात थेत बोलण्याची कुणीही हिम्मत दाखवत नाही. परंतु, राजकीय नेत्यांकडे तक्रार केल्यास आपल्याला न्याय मिळेल, अशी खात्री वाटत असल्याने एका महिला कर्मचार्‍याने थेट चित्रा वाघ यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येते. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी त्यांनी बुधवारी (दि.12) नाशिकच्या शासकीय कार्यालयांना भेट दिली. यात विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका व जिल्हा परिषद आस्थापनांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेत त्यांनी सामान्य प्रशासन विभागातील कर्मचार्‍यांशी चर्चा केली. येथील महिला कर्मचार्‍यांची कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मग त्यांच्याकडे प्राप्त झालेली तक्रार नेमकी कुठल्या कार्यालयातून आलेली आहे, याची खात्री पटत नसल्याने त्यांनी दिवसभर धावाधाव केल्याचे समजते. जिल्हा परिषदेतील महिलांविषयी तक्रार नसल्याचे समजात येथील कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -