घरमहाराष्ट्रअनिल गोटेंनी दिला राजीनामा; लोकसभा निवडणुकीसाठी भरणार अर्ज

अनिल गोटेंनी दिला राजीनामा; लोकसभा निवडणुकीसाठी भरणार अर्ज

Subscribe

आमदारकीचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर अनिल गोटेंनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर टीका केली. भाजपमधील पक्षांतर्गत राजकारणाचा कंटाळलो आल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अनिल गोटे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. अनिल गोटे यांनी आज भाजपाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीपासून नाराज असलेल्या अनिल गोटे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे. ते उद्या लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा

दरम्यान, ‘मी आजही मोदी समर्थकच आहे, परंतु मोदींच्या नावाने वाईट कामे करणाऱ्यांना विरोध असल्याचे गोटे यांनी यावेळी सांगितले. ‘आमदारकीचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर अनिल गोटेंनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर टीका केली. भाजपमधील पक्षांतर्गत राजकारणाचा कंटाळलो आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशीही बोललो, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही’, असे अनिल गोटे यांनी सांगितले.अनिल गोटे यांनी यापूर्वी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. आज त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणूक लढवणार

धुळे मनपाच्या निवडणुकीत सुभाष भामरेंनी अनिल गोटेंना बाजूला सारले होते. यानंतर गोटे-भामरे वाद टोकाला गेला होता. आता माझे एकच लक्ष्य असेल, ते म्हणजे सुभाष भामरे असे अनिल गोटे यांनी सांगितले. यामुळेच आता लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्याविरुद्ध लढण्याचे आपण ठरवले असल्याचे ते म्हणाले. गोटेंच्या या पवित्र्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात भामरे वि. गोटे वि. काँग्रेसचे कुणाल पाटील अशी तिहेरी लढत रंगणार आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

एकच लक्ष्य; धुळ्यात सुभाष भामरेंचा पराभव – अनिल गोटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -