घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री दिलीप कुमार यांच्या घरी जातात पण लोणकरच्या आईला भेटायला वेळ नाही...

मुख्यमंत्री दिलीप कुमार यांच्या घरी जातात पण लोणकरच्या आईला भेटायला वेळ नाही – नितेश राणे

Subscribe

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं बुधवारी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं. हिंदूजा रुग्णालयात सकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी राजकीय नेतेही त्यांच्या घरी पोहोचले होते. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकरने या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणकर कुटुंबियांची भेट घेतली नाही. यावरुन नितेश राणे यांनी मुखअयमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना स्वप्नील लोणकरच्या घरी जाण्यासाठी वेळ नाही, मात्र तिथे जाण्यासाठी वेळ होता असं सांगत नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचं सांत्वन करतानाचा फोटोही शेअर केला आहे.

- Advertisement -

नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ““महाराष्ट्र सरकारच्या अपयशामुळे मृत्यू झालेल्या स्वप्निल लोणकरच्या आईलाही ते भेटायला गेले असते अशी अपेक्षा. त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही, मात्र येथे जाण्यासाठी पूर्ण वेळ होता. दुख:द पण सत्य,” असं नितेश राणे ट्विटच्या माध्यमातून म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -