Zomato IPO: १४ जुलैला Zomato आयपीओ उघडणार; जाणून घ्या कितीला मिळणार शेअर

Zomato IPO to open on July 14 Price band and other details
Zomato IPO: १४ जुलैला Zomato आयपीओ उघडणार; जाणून घ्या कितीला मिळणार शेअर

ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लेटफॉर्म झोमॅटोचे बहुप्रतिक्षित आयपीओ (Zomato IPO) १४ जुलैला उघडणार असून १६ जुलैला बंद होणार आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांची वाढती मागणी दृष्टीकोनातून घेऊन कंपनीने आयपीओचा आकार वाढवला आहे. याच महिन्यात बाजारात कंपनी लिस्ट होईल. कंपनीच्या आयपीओच्या माध्यमातून ९ हजार ३७५ कोटी रुपये जमा करू शकते. झोमॅटोच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदार कमाई करू शकतो, अशी आशा व्यक्त केली आहे.

रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट्सच्या माहितीनुसार, कंपनीचा आयपीओ १४ जुलैला उघडेल. पहिल्यांदा कंपनी १९ जुलैला आयपीओ उघडणार होती. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहून कंपनीने ५ दिवसांपूर्वी आयपीओ उघडण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसई (BSE)च्या माहितीनुसार कंपनीचे प्राइज बँड (Price band) ७० ते ७२ रुपये असू शकते. आज कंपनी प्राइज बँडची घोषणा करू शकते. कोटक महिंद्र कॅपिटल कंपनी, मॉर्गन स्टेनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रेडिट सुइस सेक्युरिटीज (Credit Suisse Securities) प्रायव्हेट लिमिटेड यावर इश्यूचे ग्लोबल कोऑर्डिनेटर आणि बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

आर्थिक वर्ष २०२१च्या पहिल्या तिमाहीमध्ये झोमॅटोचा रेवेन्यू (महसूल) १ हजार ३६७ कोटी रुपये होता. फूड-टेक कंपनीचा खर्च जवळपास १ हजार ७२४ कोटी रुपये होता, याच्या परिणामामुळे कंपनीला ६८४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. आर्थिक वर्ष २०२०मध्ये झोमॅटोच्या उत्पन्नात ९६ टक्क्यांनी वाढ झाली होती. जी आर्थिक वर्ष २०१९मध्ये १ हजार ३९८ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२०मध्ये २ हजार ७४३ कोटी रुपये होती. झोमॅटोला कमीत कमी ४०३ मिलियन ऑनलाईन ऑर्डर मिळाल्या, ज्या ऑर्डरचे एकूण मूल्य आर्थिक वर्ष २०२० दरम्यान ११ हजार २२१ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी झोमॅटोने २ लाखांहून अधिक डिलिव्हरी पार्टनर्ससोबत देशभर जवळपास ५०० शहरांमध्ये डिलिव्हरी करण्याची सेवा केली.

दरम्यान झोमॅटोच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे स्टॉकचे प्रिमियम २० टक्क्यांनी वाढला आहे. एनालिस्ट्च्या माहितीनुसार, झोमॅटोला कोरोनासंबंधित निर्बंधांचा खूप फायदा झाला आहे. येणाऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा रेवेन्यू (महसूल) वाढण्याची आशा आहे.


हेही वाचा – Petrol Diesel Price: इंधनदरवाढीचा भडका कायम! आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या