घरमहाराष्ट्ररोहित पवार आता मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर; बारामती अॅग्रोबाबत केलं ट्विट

रोहित पवार आता मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर; बारामती अॅग्रोबाबत केलं ट्विट

Subscribe

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी पावसाळी अधिवेशनापासून ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करत आहे. कंबोज यांनी राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता लवकरंच तुरुंगात जाण्याचं भाकीत ट्विटमधून केले होते. यातून त्यांचा बोलण्याचा रोख हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता. यावरून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी कंबोज यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहीत पवार यांनी देखील कंबोज यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहीत कंबोज यांनी सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावला आहे, त्यामुळे त्यांच्या ट्वीटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान आता रोहित पवारचं मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर आले आहेत. कंबोज यांनी बारामती अॅग्रो कंपनीबाबत एक सूचक ट्विट केलं आहे. ‘बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या केस स्टडीचा मी सध्या अभ्यास करत आहे. मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यामागची यशोगाथा समजून घेण्यास तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे.’ असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. त्यामुळे कंबोज आता रोहित पवार यांना टार्गेट करत आहेत.

- Advertisement -

रोहित पवार बुलढाण्यातमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी कंबोज यांनी केलेल्या ट्विटला प्रत्युत्तर दिले होते.
जेव्हा त्यांनी ट्वीट केले, तेव्हाच मी मोहित कंबोजबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओव्हरसीज बँकेत 52 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा विषय चर्चेत आहे. त्याचबरोबर त्यांनी अजून दोन-तीन बँकांना चुना लावला आहे. सामान्य लोकांचा पैसा ज्या बँकेत असतो, त्याच बँकेला त्यांनी चुना लावला असल्याने त्यांच्या ट्वीटला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे. असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता.


उत्तर प्रदेशसह ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -