घरमहाराष्ट्रपद गेल्यानंतर त्यांना महाराष्ट्राची स्थिती पाहण्यास वेळ मिळाला; सुजय विखेंचे ठाकरेंवर टीकास्त्र

पद गेल्यानंतर त्यांना महाराष्ट्राची स्थिती पाहण्यास वेळ मिळाला; सुजय विखेंचे ठाकरेंवर टीकास्त्र

Subscribe

राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ओला दुष्काळ पडला आहे. यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून मदतीचे मागणी केली जात आहे. अशा परिस्थित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या ओला दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करत आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यावर सत्ताधारी भाजपकडून टीका केली जात आहे. ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होता तो महाराष्ट्र कसा दिसतो हे पाहण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहेत. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही, अशा शब्दात भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिल्याचा टोलाही विखेंनी लगावला आहे. शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर खासदार विखे पाटील म्हणाले की, याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा सुरु आहे. NDRF च्या निकषापेक्षा जास्त मदत करण्यासंदर्भात बागायत, जिरायत क्षेत्रानुसार मदत देणं याबाबत चर्चा सुरु आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी खात्रीही सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

शिंदे फडणवीस सरकार दहा वर्षे हटणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल की नाही हा दुसरा भाग आहे. परंतु त्यांचा मुख्यमंत्री कोण होईल याचं नाव पहिला निश्चित करावं. कुटुंबामध्ये कोणाला ते नेतृत्व देताय आणि मग त्यावर कारवाई करावी, पक्ष जे चालवतात त्यांच्या तोंडून तो निर्णय आला तर त्यावर भाष्य करेन असही विखे पाटील म्हणाले.

राहिता राहिला प्रश्न अजित पवार यांच्या नेतृत्त्वाचा, ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्यांनी नेतृत्त्व करावी की नाही हे त्यांच्या पक्षाअंतर्गत प्रश्न आहे असेही विखे पाटील म्हणाले. मात्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार असून ते पुढील दहा वर्ष हटणार नाही, ज्यांना पदं वाटून घ्यायचं आहे, त्यांनी घरात बसून आपापसात वाटून घ्यावी, असा खोचक टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला आहे.


ईडी सरकार महाराष्ट्राचे की गुजरातचे? दानवेंचा शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -