घरमहाराष्ट्रBJP vs Thackeray : चंद्रशेखर बावनकुळेंनी काढली आदित्य ठाकरेंची लायकी, काय आहे...

BJP vs Thackeray : चंद्रशेखर बावनकुळेंनी काढली आदित्य ठाकरेंची लायकी, काय आहे प्रकरण?

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे सध्या ठाकके गट आणि भाजपामध्ये जुंपली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांची लायकी काढत उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 चा एक किस्सा सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. आदित्य यांना मुख्यमंत्री बनवून फडणवीसांना दिल्लीच्या राजकारणात जायचे होते, असा शब्द त्यांनी दिला होता, असेही शनिवारी (ता. 20 एप्रिल) एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. यामुळे आता ठाकरे गट आणि भाजपामध्ये जुंपली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांची लायकी काढत उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत. (BJP vs Thackeray: Chandrasekhar Bawankule has drawn Aaditya Thackeray worth)

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे भाजपा नेते आक्रमक झालेले आहेत. याबाबत आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच बोलायला राहिले नाही. त्यामुळे ते जनतेसमोर काहीही बोलत आहेत. आदित्य ठाकरेंना कोणी मुख्यमंत्री केले नसते, कोणी मंत्री देखील केले नसते. आदित्य ठाकरेंची लायकी काय आहे? कोणत्या पंचायत किंवा संसदेत त्यांनी काम केले. कोणाचे रेशन कार्ड, आधारकार्ड तरी काढले आहे का? असे कडवट प्रश्न बावनकुळे यांच्याकडून उपस्थित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे समाजकारण ही सलीम – जावेदची स्क्रिप्ट नाही; फडणवीसांनी सुनावले

तसेच, एका मतदारसंघात हवेत निवडून आले. एखाद्यावेळी अपघाताने आमदार होऊ शकते कोणी. पण त्यांची मुख्यमंत्री होण्याची लायकी आहे का? असा खोचक प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी झाल्याने कोणीही त्यांची सभा घ्यायला तयार नाही. सभेला यायला कोणी तयार नाही. उद्धव ठाकरेंना माहीत आहे की, ते लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ठाकरेंचे 18 खासदार निवडून आले होते. शरद पवार आणि काँग्रेससोबत बसून त्यांनी जनाधार संपवला आहे, असा सणसणीत टोलाही बावनकुळेंनी लगावला आहे.

- Advertisement -

निवडणुकीत विकासाचे वचननामे जनतेसमोर न मांडता, ज्या गोष्टी निरर्थक आहेत. ज्या गोष्टी महाराष्ट्राची जनता अपेक्षित करत नाही त्या गोष्टी लोकांना सांगितल्या जात आहेत. विकासाचा मुद्दा आहे, शेतीचे प्रश्न आहेत. शरद पवार कृषीमंत्री असताना महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर गेला होता. पण, पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कामे केले आहेत, असेही यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले.

त्यांच्या घरचे कोणी मंत्रिदेखील होणार नाही…

उद्धव ठाकरे यांना पुत्रप्रेम आहे. त्यांना आदित्य यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे ते आता देवेंद्र फडणवीसांच्या तोंडी ते टाकत आहेत. त्यांना माहिती आहे की त्यांच्या घरचे कोणी मंत्रिदेखील होणार नाही. उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्रीपद घेतले. स्वत:च्या मुलाला मंत्री केले, एका कार्यकर्त्याला मोठे करता आले असते, पण त्यांनी मुलाला मंत्री केले, असे टीकास्त्र बावनकुळे यांच्याकडून डागण्यात आले.

इतिहासातील निष्क्रिय मुख्यमंत्री…

अडीच वर्षे खिशात पेन नसलेला मुख्यमंत्री, अडीच वर्षात दोनदा विधानभवनात आलेला मुख्यमंत्री असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला आहे. राज्यातल्या इतिहासतला पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मोदी यांची त्सुनामी महाराष्ट्रात आहे. त्यामुळे विरोधकांचे काही राहणार नाही, अशी जहरी टीकाही यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

हेही वाचा… Uddhav Thackeray : मोदी-शहांचा व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगावर ताशेरे


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -