घरमहाराष्ट्रभाजपच्या महिला आमदारासह घरातील ५ जणांना कोरोनाची लागण

भाजपच्या महिला आमदारासह घरातील ५ जणांना कोरोनाची लागण

Subscribe

कोरोनाचा शिरकाव आता राजकीय नेते मंडळींमध्येही झाल्याचे दिसत आहे. राज्यात गणेशोत्सव सुरू असताना कोरोनाचे संकट काही केल्या थांबत नाहीये. यावेळी भाजपच्या महिला आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूरच्या भाजप आमदार, मेघना बोर्डीकर साकोरे यांना कोरोणाची लागण झाली असून, मेघना बोर्डीकर यांच्यासह घरातील इतर ५ व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार आहेत. ही त्यांची पहिलीच टर्म आहे. मागील आठवड्यामध्ये, काही कामानिमित्त मेघना बोर्डीकर या मुंबई इथे गेल्या होत्या, त्यानंतर त्या पुणे इथल्या निवासस्थानीच होत्या.

- Advertisement -

या दरम्यान, त्यांची प्रकृती खालवली. कोरोनाची लक्षण दिसल्यामुळे त्यांनी चाचणी केली. त्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर तातडीने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची ही कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी पाचही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, सर्वांवरच पुणे इथं उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.  मेघना यांनी परभणी ते मुंबई आणि त्यानंतर पुणे असा प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना वेळीत चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


मुख्यमंत्र्यांसह २३ काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -