घरताज्या घडामोडीकैलास मानसरोवर भागात ड्रॅगन ची घुसखोरी, क्षेपणास्त्र तळ उभारण्याच्या तयारीत!

कैलास मानसरोवर भागात ड्रॅगन ची घुसखोरी, क्षेपणास्त्र तळ उभारण्याच्या तयारीत!

Subscribe

लडाख सीमेवर आक्रमकता दाखवणारा चीन आता धार्मिक स्थळांनाही सोडत नाहीये. जगभरातील कोट्यावधी हिंदुंचे श्रध्दास्थान असलेल्या कैलास मानसरोवर परिसरात चीनकडून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणस्त्रांचा तळ उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात सुरू झालेलं काम आता पूर्ण झाले आहे. सॅटलाइट फोटोंच्या विश्लेषणांवरून इंडिया टूडेने हे वृत्त दिलं आहे,

धार्मिक दृष्टया महत्त्वाचे

कैलास मानसरोवर हे स्थान हिंदुंसाठी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. दरवर्षी हिंदू भाविक केलास मानसरोवर यात्रेसाठी जातात. मोठ्या प्रमाणावरील लष्करी उपस्थितीमुळे या भागाला आता युध्द भूमीचे स्वरूप येणार आहे. पूर्व लडाख सीमेवर भारत- चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. कैलास मानसरोवला जाण्यासाठी भारताने लिपूलेख पासपर्यंत ८० किलोमीटरचा रस्ता बांधला आहे.

- Advertisement -

१७ हजार फूट उंचीवर लिपूलेख पासपर्यंत जाणार हा ८० किमीचा रस्ता बांधल्यामुळे कैलास मानसरोवरला जाण्याचा वेळ वाचणार आहे तसेच प्रवासही सुखकर झाला आहे. चीनकडून धार्मिक स्थळाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात लष्करीकरण सुरु आहे. सॅटलाइट फोटोंच्या विश्लेषणावरुन चीनची मानसरोवर भागात जमिनीवरुन हवेत मारा करणारी HQ-9 सॅम मिसाइल सिस्टिम तैनात करण्याची योजना आहे.

HQ-9 सॅम मिसाइल सिस्टिम

क्षेपणास्त्र प्रणालीबरोबर वाहनआधारीत रडावर यंत्रणाही सज्ज असले. HQ-9 सॅम मिसाइल सिस्टिम HT – 233 रडावर अवलंबून असते. त्याशिवाय टाइप ३०५B, टाइप ३०५A,  YLC-20 आणि DWL-002 रडार्सही असतील.

- Advertisement -

हे ही वाचा – हा आहे सरकारचा Corona test बाबत नवा निर्णय!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -