घरमहाराष्ट्रभाजपचं मिशन २०२४ सुरु, प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी

भाजपचं मिशन २०२४ सुरु, प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी

Subscribe

देशात दोन वर्षानंतर २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने भाजपने काम करायला सुरुवात केली आहे. भाजपचं मिशन २०२४ सुरु झालेलं आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत मिशन २०२४ च्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले आहेत. प्रत्येक प्रमुख नेत्याकडे लोकसभेच्या दोन मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने केली आहे. २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदार संघ स्वबळावर लढण्यासाठी भाजप तयारीला लागला आहे. मतदार संघातील पक्षबांधणीपासून, सदस्य नोंदणी तर दुसरीकडे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रत्येक विषयावर भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे. याशिवाय, प्रत्येक नेत्याकडे २ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली असून त्यामध्ये येणाऱ्या सर्व विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. १४ नेत्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे नेते संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटनाबांधणी करणार आहेत. भाजप संघटनमंत्री श्रीकांत भारती या सर्व दौऱ्याचं समन्वय करणार आहेत.

- Advertisement -

कोणत्या नेत्याकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?

१. देवेंद्र फडणवीस – सोलापूर, अहमदनगर
२. चंद्रकांत दादा पाटील – ठाणे ग्रामीण आणि नाशिक
३. सुधीर मुंनगंटीवार – बीड, जालना
४. पंकजा मुंडे – कोल्हापूर, सांगली
५. आशिष शेलार – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
६. श्रीकांत भारतीय – नांदेड, परभणी
७. चंद्रशेखर बावनकुळे – अकोला, अमरावती
८. प्रविण दरेकर – पालघर मिरा भाईंदर
९. गिरीष महाजन – उस्मानाबाद, हिंगोली
१०. संजय कुटे – दक्षिण रायगड,उत्तर रायगड
११. रविंद्र चव्हाण – सातारा, पुणे ग्रामीण
१२. रावसाहेब दानवे – बुलढाणा नंदूरबार
१३. संभाजी पाटील निलंगेकर – गोंदिया, भंडारा
१४. सुधीर मुंनगंटीवार – जालना आणि बीड

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -