घरमहाराष्ट्रअजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

Subscribe

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात येणार आहे. त्यामुळे 'आपलं महानगर'ने ३ मे रोजी दिलेल्या 'राज्याच्या मुख्य सचिवपदी अजोय मेहता, सेनेची डोकेदुखी वाढणार!' या वृत्तावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात येणार आहे. आज, शुक्रवारी त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘आपलं महानगर’ने ३ मे रोजी दिलेल्या ‘राज्याच्या मुख्य सचिवपदी अजोय मेहता, सेनेची डोकेदुखी वाढणार!’ या वृत्तावर शिक्कामोर्तब होणार आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा अडसर दूर झाला. पुढील ३ दिवसांत अजॉय मेहता पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. येत्या सप्टेंबरमध्ये अजोय मेहता निवृत्त होणार आहेत.

महापालिका आयुक्तपदासाठी चुरस 

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बढती झाल्याने मुंबई महापालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर सध्या मुख्य सचिवपदी असलेले युपीएस मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची शक्यता आहे. युपीएस मदान यांची या वर्षीच्या मार्च महिन्यात मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. येत्या ऑक्टोबर महिन्यात मदान निवृत्त होणार आहेत मात्र तत्पूर्वीच मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचं बोललं जात आहे. युपीएस मदान यांना राज्य सरकारकडून महामंडळ अथवा आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मेहता

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लोकप्रिय निर्णय घेण्याकरता आणि ते राबविण्याकरिता आपल्या विश्वासातला आणि मोठा अनुभव गाठीशी असलेली व्यक्ती मुख्य सचिव या प्रशासनाच्या सर्वोच्चपदी असावी, यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी निवड करण्याचे निश्चित केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तर त्याच बॅचचे मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना त्यांचा सेवेचा सुमारे पावणे चार वर्षांचा कालावधी होवूनही त्यांना आयुक्तपदीच ठेवण्यात आले. सप्टेंबर २०१९ रोजी मेहता तर ऑक्टोबर २०१९ मध्ये मदान निवृत्त होणार आहेत. मात्र दोघांनाही मुख्य सचिवपद उपकृत करता यावे यासाठीच ही व्यवस्था करण्यात आल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -