घरमहाराष्ट्रBombay University Election: 'सिनेट'ची निवडणूक म्हणजे काय रे भाऊ?

Bombay University Election: ‘सिनेट’ची निवडणूक म्हणजे काय रे भाऊ?

Subscribe

सिनेटची निवडणूक म्हणजे काय रे भाऊ? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. तेव्हा कशा होतात या निवडणुका, मतदार कोण? तर उमेदवार कोण असतात हे समजून घेणे गरजेचे आहे.

मुंबई : राज्यातीस सत्तांतरानंतर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या सर्वात मोठ्या म्हणजेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचे बिगूल वाजले आहेत. पुढील महिन्यात 10 सप्टेंबर सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदा या निवडणुकीत युवा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आमनेसामने दिसण्याची शक्यता जरी असली तरी शिंदेच्या शिवसेनेचीसुद्धा यामध्ये एंट्री होणार आहे. असे जरी असले तरी सिनेटची निवडणूक म्हणजे काय रे भाऊ? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. तेव्हा कशा होतात या निवडणुका, मतदार कोण? तर उमेदवार कोण असतात हे समजून घेणे गरजेचे आहे.(Bombay University Election What is ‘Senate’ election brother.)

हा असतो सिनेट निवडणुकीचा उद्देश

सिनेट म्हणजे अधिसभा. जशी राज्याची विधानसभा व देशाची लोकसभा असते अगदी तशीच राज्यातील कोणत्याही विद्यापीठाची सिनेट असते. विद्यापीठाचे नियम ठरविणे, फी ठरविणे, धोरण ठरविणे, आर्थिक बजेट ठरविणे आदी कामे सिनेटच्या माध्यामातून केली जातात.

- Advertisement -

कोण असतात सिनेटचे सदस्य?

सिनेटचे सदस्य तीन प्रकारची असतात. यामध्ये पदसिध्द, निर्वाचित आणि तिसरे म्हणजे नामनिर्देशित सदस्य. यात निर्वाचित सदस्यांसाठी 41 जागांसाठी निवडणूक होते. मात्र यातही वर्गवारी करण्यात आली आहे. यात पहिला वर्ग म्हणजे माजी विद्यार्थ्यांकडून 10 सदस्य निवडून दिले जातात. दुसरा म्हणजे विविध महाविद्यालयांकडून निवडून दिलेले 10 प्राध्यापक, तिसरा म्हणजे प्राचार्यांकडून निवडून दिलेले 10 सद्स्य, चौथा म्हणजे संस्थाचालकांमधून निवडून दिलेले 6 सदस्य, विद्यापीठ आवारातील 3 सदस्य व विद्यार्थ्यांमधून निवडूण दिलेले अध्यक्ष व सचिव असे 2 सदस्य. असे सदस्य असतात.

हेही वाचा : अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

- Advertisement -

अशी होते सिनेटची निवडणूक

ही निवडणूक दर पाच वर्षांनी होत असते. याला अपवाद असतो तो केवळ विद्यार्थी परिषद अध्यक्ष व सचिव पदाचा कारण या दोन जागांसाठी दरवर्षी निवडणूक होते. उर्वरित 39 सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. यासाठी वेगवेगळे पॅनल उभे केले जातात. निवडणुकीत विजयी झालेल्यांपैकी प्रत्येक गटातून दोन सदस्यांना मॅनेजमेंट काऊन्सिंलसाठी निवडून दिले जातात. हे मॅनेजमेंट काऊंन्सिल म्हणजे त्यांचे छोटोखानी मंत्रिमंडळच असते. या मंत्रिमंडळाच्या धोरणांनुसार सिनेटचे कार्य चालते.

हेही वाचा : हुकूमशाहीचं सरकार आम्हाला पळवून लावायचंय; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर साधला निशाणा

असा आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक कार्यक्रम

उमेदवारांना 18 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार, उमेदवारी अर्ज 25 ऑगस्टपर्यंत माघारी घेता येणार, निवडणुकीसाठी 10 सप्टेंबरला मतदान, मतमोजणी 13 सप्टेंबर रोजी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -