घरदेश-विदेशPatna meeting : लोकशाहीवर हल्ला करणाऱ्याला आम्ही विरोध करू; उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

Patna meeting : लोकशाहीवर हल्ला करणाऱ्याला आम्ही विरोध करू; उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

Subscribe

Patna meeting : नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि भाजपविरोधात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी देशभरातील 15 विरोधी पक्ष एकत्र आले होते. या बैठकीनंतर सर्व प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर (BJP) निशाणा साधला. ते  म्हणाले की, लोकशाहीवर हल्ला करणाऱ्याला आम्ही विरोध करू. (Patna meeting We will oppose those who attack democracy Uddhav Thackeray targets BJP)

उद्धव ठाकरे म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारपर्यंत सर्व लोक इथे जमले आहेत. आमची विचारधारा वेगळी असू शकते, पण देश एक आहे आणि हा देश वाचवण्यासाठी, त्याची अखंडता टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाहीवर हल्ला करणाऱ्याला आम्ही विरोध करू. देशात कोणीही हुकूमशाही आणायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात उभे राहू, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला.

- Advertisement -

हेही वाचा – विचारधारेची लढाई असून आम्ही सर्व एकत्र; राहुल गांधींचा भाजपा, आरएसएसवर हल्लाबोल

विरोधी पक्षाच्या बैठकीची सुरुवात चांगली झाली आहे, भविष्यातही चांगलीच बैठक होईल, याची मला खात्री आहे, अशा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींच्या वक्तव्याचा संदर्भ देत आम्ही विरोधक नाही, तर आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि आम्ही यापुढे भेटत राहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Mamata Banerjee : आम्ही विरोधक नाही, आम्ही या देशातलेच आहोत; ममतांचा भाजपला टोला

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण्यामध्ये 15 विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठीकत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे, बिहारचे उपमुख्यमंत्री अखिलेश यादव, एनसी नेते ओमर अब्दुल्ला, सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा उपस्थित होते.

हेही वाचा – राहुल गांधींचा लग्नाला होकार; वडिलकीच्या नात्याने भर पत्रकार परिषदेत लालू यादव यांनी मांडला प्रस्ताव

बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेला नितीशकुमार, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, लालू यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, डी. राजा, येचुरी, दीपंकर यांच्यासह इतर नेत्यांनी संबोधित करताना सांगितेल की, आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आघाडीची पुढील बैठक 10 ते 12 जुलै दरम्यान शिमल्यात काँग्रेसतर्फे आयोजित केली जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जागावाटप, महायुतीचा संयुक्त कार्यक्रम, संयुक्त आंदोलन आदी मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -