घरताज्या घडामोडीमातोश्रीवरील आरोपांनंतर शिंदे गटाला केंद्राचे गिफ्ट; प्रताप जाधवांवर मोठी जबाबदारी

मातोश्रीवरील आरोपांनंतर शिंदे गटाला केंद्राचे गिफ्ट; प्रताप जाधवांवर मोठी जबाबदारी

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार असे बोलले जात होते, तर शिंदे गटाकडूनही ठाकरेच्या शिवसैनिकांवर टीका केली जात होती. त्याचवेळी बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव 100 खोके मातोश्री ओके, असं वक्तव्य केल्यामुळे प्रतापराव जाधवांनी एकच खळबळ उडवून दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार असे बोलले जात होते, तर शिंदे गटाकडूनही ठाकरेच्या शिवसैनिकांवर टीका केली जात होती. त्याचवेळी बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव 100 खोके मातोश्री ओके, असं वक्तव्य केल्यामुळे प्रतापराव जाधवांनी एकच खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, जाधवांच्या मातोश्रीवरील या आरोपांनंतर शिंदे गटाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. विशेष म्हणजे खासदार प्रताप जाधव यांच्यावर केंद्रात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. संसदेच्या स्थायी समितीत काही महत्त्वाचे बदल केंद्र सरकारकडून करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिंदे गटालाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -

खासदार प्रतापराव जाधव यांच्या रुपाने शिंदे गटाला माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधवांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Buldana MP Prataprao Jadhav Appointed as Chief of Standing Committee of Information and Technology in union government )

उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतापराव जाधवांचे आरोप

- Advertisement -

सचिन वाझे 100 कोटी रुपयांची वसुली करुन मातोश्रीवर पोहोचवत होता, असे आरोप प्रताप जाधव यांनी केले होते. या आरोपांनंतर प्रतापराव जाधव यांनी आपल्याला तसे म्हणायचे नव्हते, असे स्पष्टही केले होते.

मोदी सरकारने प्रतापराव जाधव यांना केंद्रात दिलेल्या जबाबदारीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याआधी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे अध्यक्षपद होते. त्यांच्या जागी आता प्रतापराव जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.


हेही वाचा – भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सोनिया गांधींचाही सहभाग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -