घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदांडिया खेळताना धक्का; तरुणाचा खून

दांडिया खेळताना धक्का; तरुणाचा खून

Subscribe

उपनगर येथील घटना, पाच संशयित ताब्यात, तीन अल्पवयीन मुलांचा समावेश

नाशिकरोड : दांडिया खेळण्याच्या वादातून युवकांच्या भांडणात एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल उर्फ बाबू लोट (१९, रा. वडाळा नाका, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. पवन कांताराम कोळे, (२१, रा. गुरुप्रसाद अपार्टमेंट, ड्रीम सिटी जवळ, शिवाजीनगर), यश सुब्रमण्यम स्वामी (२०, रा. महाराष्ट्र हायस्कूल जवळ उपनगर) अशी ताब्यात घेतलेल्यांचे नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर भागात मंगळवारी (दि.४) रात्री कमल उर्फ बाबू लोट हा त्याच्या मित्रासोबत दांडिया खेळण्यासाठी आलेला होता. त्याचे चैतन्य लोखंडे, समीर नळवाडे व त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्यासोबत वाद झाला. त्यावेळी झालेल्या हाणामारीत टोळक्याने कमल लोट याच्या पोटावर धारदार चाकूने वार केला. त्यात कमल गंभीर झाला. त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ. धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, निरीक्षक पंकज भालेराव, निरीक्षक विजय पगारे घटनास्थळी दाखल झाले. खून झाल्याच्या वृत्ताने संतप्त नातेवाईक व नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. यावेळी नातेवाईकांनी हल्लेखोर तरुणांना अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुले व पवन कांताराम कोळे, यश सुब्रमण्यम स्वामी यांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय पगारे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -