घरमहाराष्ट्रBuldhana Bus Accident : मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत...

Buldhana Bus Accident : मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर

Subscribe

Buldhana Bus Accident : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर
(Samriddhi Highway) खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रती सहवेदना प्रकट करुन या दुर्देवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत. (Buldhana Bus Accident Condolences from Chief Minister 5 lakh aid announced to the families of the deceased)

हेही वाचा – Buldhana Bus Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात; 25 प्रवाशांचा

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरे गटाचे आज शक्तिप्रदर्शन, मुंबई महापालिकेवर मोर्चा

कसा झाला अपघात?

विदर्भ ट्रॅव्हल्स ही खासगी बस नागपूरहून काल दुपारी 4 वाजता पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून 30 च्या आसपास प्रवासी प्रवास करत होते. रात्री 1 ते दीडच्या सुमारास समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा येथे भीषण अपघात झाला. बस खांबाला धडकल्यानंतर दुभाजकाला धडकली आणि डाव्या बाजूला पलटी झाली. त्यामुळे दरवाजामधून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले, मात्र इतर प्रवासी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बसने अचानक पेट घेतला. त्यानंतर बसचे टायर फुटले आणि डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी अनेक प्रवासी बसमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते, किंचाळत होते, पण त्यांना बाहेर पडता आले नाही. आग इतकी मोठी होती की, बसमधील प्रवाशांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -