घरमहाराष्ट्रBuldhana Bus Accident : अजित पवारांकडून शोक व्यक्त; तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश

Buldhana Bus Accident : अजित पवारांकडून शोक व्यक्त; तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश

Subscribe

Buldhana Bus Accident : नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा (Buldana – Sindkhed Raja) येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. (Buldhana Bus Accident Condolences from Ajit Pawar Instructions to take immediate measures)

हेही वाचा – Buldhana Bus Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात; 25 प्रवाशांचा

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, “आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज समृध्दी महामार्गावर झालेल्या बस अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाश्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. शासनाने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

सरकारने कठोर नियम करणे गरजेचे – जयंत पाटील

समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा बनला असून खासगी वाहनांची सुव्यवस्था आणि वेगमर्यादा यावर सरकारने कठोर नियम करणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत व्यक्त केले आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खाजगी प्रवासी बसने पेट घेतल्याने सुमारे 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण राष्ट्रवादी परिवार सहभागी असल्याचे सांगतानाच मृतांना जयंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर जखमी झालेल्या प्रवाशांना योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत अशीही मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा – ठाकरे गटाचे आज शक्तिप्रदर्शन, मुंबई महापालिकेवर मोर्चा

कसा झाला अपघात?

विदर्भ ट्रॅव्हल्स ही खासगी बस नागपूरहून काल दुपारी 4 वाजता पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून 30 च्या आसपास प्रवासी प्रवास करत होते. रात्री 1 ते दीडच्या सुमारास समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा येथे भीषण अपघात झाला. बस खांबाला धडकल्यानंतर दुभाजकाला धडकली आणि डाव्या बाजूला पलटी झाली. त्यामुळे दरवाजामधून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले, मात्र इतर प्रवासी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बसने अचानक पेट घेतला. त्यानंतर बसचे टायर फुटले आणि डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी अनेक प्रवासी बसमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते, किंचाळत होते, पण त्यांना बाहेर पडता आले नाही. आग इतकी मोठी होती की, बसमधील प्रवाशांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -