घरमहाराष्ट्रमोकाट वळूने मांडला उच्छाद

मोकाट वळूने मांडला उच्छाद

Subscribe

फलटण शहरात मोकाट फिरणार्‍या एका वळूने उच्छाद मांडून रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. परंतु या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फलटण शहरातील हडको परिसरात मोकाट फिरणार्‍या एका वळूने रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

सकाळी मुलांना शाळा भरण्याची वेळ असल्याने लहान मुले व पालक यांच्या अचानकपणे अंगावर धावून जाण्यास सुरूवात केल्याने पळापळ झाली. यानंतर फलटण नगर परिषदेच्या कर्मचारी यांना याबाबत अवगत करण्यात आले. नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी वेळीच उपाययोजना करत नागरिकांना वळू असलेल्या ठिकाणी जाण्यापासून रोखले.

- Advertisement -

फलटण शहरातील रहदारीच्या ठिकाणी वळू गेला असता तर फार मोठा अनर्थ झाला असता. नगर परिषद कर्मचारी यांनी वळूस गोळीबार मैदान व विद्यानगर परिसरात जाण्यास भाग पाडले व एका रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला ट्रॅक्टर व इतर वाहणे लावून रस्ता बंद केला व त्या रस्त्याने वळूस जाण्यास भाग पाडून वाहणे लावून रस्ता बंद केला. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी फलटण यांना भुल देण्यास बोलण्यात आले असता संबधित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्याकडे हे काम येत नाही असे सांगितले व याबाबत मार्गदर्शन मागवून बघू ,असे उर्मट उत्तर दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -