घरमहाराष्ट्रराज्यात लवकरच पाण्यावर धावणार बस, टॅक्टर आणि बोट?

राज्यात लवकरच पाण्यावर धावणार बस, टॅक्टर आणि बोट?

Subscribe

आता पाण्यावर चालणारा टॅक्टर, बस आणि बोट राज्यात धावण्याची शक्यता आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तसा विचार करत असून येत्या चार ते पाच दिवसांत पाण्यावर चालणाऱ्या टॅक्टर, बोट आणि बसचा डेमो मुंबईत होणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल दरवाढीने हैराण आहात का? पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या दरवाढीमुळे तुम्हाला तुमचे वाहन नकोसे झाले का? तर थोडं थांबा… कारण आता पाण्यावर चालणारा टॅक्टर, बस आणि बोट राज्यात धावण्याची शक्यता आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तसा विचार करत असून येत्या चार ते पाच दिवसांत पाण्यावर चालणाऱ्या टॅक्टर, बोट आणि बसचा डेमो मुंबईत होणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज, बुधवारी दिली. नासामध्ये काम करणाऱ्या काही संशोधकांनी याचा शोध लावला असून सध्या जिम्पेक्स या कंपनीत हे टॅक्टर, बस आणि बोट बनवल्या आहेत. त्यामुळे आता जिम्पेक्स ही कंपनी याचा डेमो लवकरच मुंबईच्या चौपाटीवर देणार आहे. डेमो बघून त्यानंतर या कंपनीशी करार करण्यात येणार असलयाचे देखील रामदास कदम यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मुलांना देणार टॅक्टर 

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कर्जामुळे राज्यातील शेतकरी पुरता हैराण झाला असून, कर्जबाजारपणाला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केली. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना असे पाण्यावर चालणारे टॅक्टर उपलब्ध करून देण्याचा मानस देखील सरकारचा असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे.

- Advertisement -

नद्यांचे प्रदूषण कमी करणार 

विशेष म्हणजे एकीकडे पाण्यावर चालणारी वाहने आणण्याचा विचारात असताना राज्य सरकार नद्यांच्या संवर्धनासाठीदेखील विचार करत आहे. राज्यातील काही नद्या या प्रदूषणमुक्त करण्यासाठी पर्यावरण विभागाने ६ हजार कोटींचा प्रस्ताव बनवला असून, जिम्पेक्स याच कंपनीला याचे काम देण्यात येणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या सर्व प्रस्तावाला मंजुरी मिळणार असल्याचे रामदास कदम यांनी बोलताना सांगितले. राज्य सरकार पर्यावरणाच्या दृष्टीने पावलं टाकत आहेत. आता पाण्यावर चालणारी बस, बोट आणि टॅक्टर महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच नद्या देखील प्रदूषण मुक्त करण्यावर भर देत आहे. त्यासाठी ६ हजार कोटींचा प्रस्ताव आहे.

या नद्या होणार प्रदूषण मुक्त 

अमरावती नदी, काथ नदी, वाकी नदी, पंचगंगा नदी, मधूगंगा, आरम नदी, भोगावती नदी, गोदावरी, पवना, उल्हास, गिरणा, कुंडलिका, पाझरा, नाग, मोसम, इंद्रायणी, मोरणा, वालधुनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -