घरमहाराष्ट्र#BusAccident : अपघाताची भीषणता जाणवते; वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवणार - मुख्यमंत्री

#BusAccident : अपघाताची भीषणता जाणवते; वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवणार – मुख्यमंत्री

Subscribe

बुलढाणा : नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा (Vidarbha Travels Bus) समृद्धी महामार्गावरील (Samriddhi Highway) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा येथे भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस पलटी झाली, यावेळी प्रवासी बसच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बसने पेट घेतला आणि 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी आहेत. या अपघात स्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पाहणी केली. यानंतर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अपघात स्थळाची पाहणी केल्यावर भीषणता जाणवत आहे. त्यामुळे या महामार्गावर वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवणार असल्याचे सांगितले. (BusAccident The horror of the accident is felt State of the art system will be installed for speed control Chief Minister)

हेही वाचा – Buldhana Bus Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात; 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेली घटना अतिशय मोठी आणि दुर्दैवी आहे. सकाळपासूनच कलेक्टर, एसपी आणि आयजीच्या संपर्कात आम्ही होतो आणि प्रत्यक्ष पाहिल्यावर या अपघाताची भीषणता लक्षात येते. रात्री दीडच्या सुमरास ही दुर्घटना घडलेली आहे. बस खांबाला धडकून डिझेल टँक फुटले आणि गाडी पुढे घासत जाऊन आग लागली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलं आहे आणि रिपोर्टही तसेच सांगतो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

दुर्दैवाने 25 लोकांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही, परंतु आठ लोक या बसमधून बाहेर निघाले आणि ते जखमी आहेत. तातडीने आम्ही सकाळी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की, त्यांच्यावर तत्काळ चांगले उपाय करा, त्यांचा जीव वाचला पाहिजे. तशाप्रकारची कारवाई सुरू झाली. परंतु दुर्दैवाने 25 लोकांनी वाचवता आले नाही, ही खंत एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा – LPG Price : गॅस सिलिंडरच्या नवे दर जाहीर, जाणून घ्या स्वस्त झाला की महाग

ही मोठी दु:खद घटना आहे. त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री दोघंही याठिकाणी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आलो आहोत.
समुद्धी महामार्गावर जे अपघात झाले आहेत, त्याच्यामध्ये दुर्दैवाने जास्तीचे अपघात हे मानवी चुकांममुळे होताना दिसतात. परंतु असे अपघात यापुढे होऊन चालणार नाही. शेवटी आपल्याला प्रत्येत जीवाची काळजी आहे आणि म्हणून सरकारने हे सर्व प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. त्यामुळे जे-जे काही या ठिकाणी करणं आवश्यक आहे, त्या सगळ्या उपाय योजना करणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवणार

एकनाथ शिंदे म्हणाले की, कोणत्याही बसमधील प्रवाशांना सुरक्षितस्थळी पोहचवण्याची जबाबदारी बस चालकाची असते. त्यामुळे प्रत्येकाने नियमाचं पालन केलं पाहिजं, ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे. परंतु दुर्दैवाने काही बाबतीत ते घडताना दिसत नाही आणि त्यामुळे अशा बेशिस्त वाहन चालकांना कंट्रोल करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा याठिकाणी लावली जाईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -