घरमहाराष्ट्रनाशिक"केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे...", सुप्रिया सुळेंचा कांदा प्रश्नावरून हल्लाबोल

“केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे…”, सुप्रिया सुळेंचा कांदा प्रश्नावरून हल्लाबोल

Subscribe

मुंबई : “केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सातत्याने करते”, अशी शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कांदा प्रश्नावरून केंद्रावर टीका केली. यावेळी सुप्रिया सुळेंनी कांदा प्रश्वावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. केंद्र सरकारने कांदा शुल्क निर्यातीवर वाढविलेला कर मागे घेण्याची मागणी केली आहे.

केंद्राकडून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय झाला. पण प्रत्येक्षात मात्र 40 लाख मेट्रिक टन कांदा आहे, पत्रकारांच्या प्रश्ना यामुळे शतकरी अडचणी यावर सुप्रिया सुळे म्हणाले, “केंद्र सरकारच्या कांदा शुल्क निर्यातच्या निर्णयाचे मी जाहीर निषेध करते. केंद्र सरकारने लवकर निर्णय घेतला पाहजे. शेतकऱ्यांचे इनकम डबल करण्याचे जुमलेबाज केंद्र सरकार आहे. जेव्हा शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात. तेव्हा केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सातत्याने करते. केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे”, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कांदा निर्यात शुल्क वाढीचा तुघलकी निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, खासदार अमोल कोल्हेंची मागणी

सरकारने एकत्र चालावे

धनंजय मुंडेंनी पीयूष गोलय यांची भेट घेतली आणि यावेळी देवेंद्र फडणवीसांनी जापानवरून कांदा प्रश्नावर ट्वीट केले. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याच्या च आहे, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शक्यता नाकारता येत नाही, कारण सरकारने एकत्र चालले पाहिजे.” केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय मागे घेण्य्याची पीयुष गोयल यांना विनंती, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मध्यंतरी टोमेटो महागल्यानंतर परदेशातून टोमेटो मागवले. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे पैसे मिळले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -