Eco friendly bappa Competition
घर क्राइम धक्कादायक: शाळेतील शिक्षकानेच दुसरीतील 4 मुलींवर केला बलात्कार; मुंबईतील घटना

धक्कादायक: शाळेतील शिक्षकानेच दुसरीतील 4 मुलींवर केला बलात्कार; मुंबईतील घटना

Subscribe

मुंबईतील विक्रोळी टागोरनगरमधील महापालिकेच्या एका शाळेतील चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मुंबईतील विक्रोळी टागोरनगरमधील महापालिकेच्या एका शाळेतील चार मुलींवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

शाळेतील पीटी शिक्षक सौरव उचाटे या शिक्षकाने दुसरीत शिकत असलेल्या 4 मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शिक्षा देण्याच्या नावाखाली हा शिक्षक लैंगिक छळ करत असल्याची माहिती काही मुलींनी त्यांच्या पालकांना दिली होती. त्यानंतर पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे. पोलिसांना या घटनेचं गांभीर्य समजत नाही आहे. पोलीस हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही वंचित कार्यकर्त्यांनी केला आहे. (Shocking School teacher himself raped 4 girls in second class Incidents in Mumbai Vikhroli)

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणातील आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. याचबरोबर चित्रा वाघ यांनी प्रसार माध्यमांशीही संपर्क साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कारवाई केली जाणार. आरोपीची कुठलीही माहिती न घेता त्याची नियुक्ती करण्यात आली, त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. तसंच, भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी पालिका प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. अशीही माहिती चित्रा वाघ यांनी दिली.

( हेही वाचा: शिवसैनिकाच्या हत्येतील आरोपीची जामिनावर सुटका; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, वाचा- काय आहे प्रकरण? )

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर हल्ला

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच कल्याणच्या तिसगावमध्ये बुधवारी संध्याकाळी एका 20 वर्षांच्या तरुणाने एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर धारधार चाकूने हल्ला केला होता. चाकून सात ते आठ वार करत त्याने या मुलीला ठार मारलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईत 4 अल्पवयीन मुलींवर शिक्षकानेच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

- Advertisment -