Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE राज्यातील १५ टक्के ऑक्सिमीटर मशीन निकृष्ट दर्जाच्या- CGSI

राज्यातील १५ टक्के ऑक्सिमीटर मशीन निकृष्ट दर्जाच्या- CGSI

Related Story

- Advertisement -

कोरोनाबाधित रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी सध्या ऑक्सिमीटर पल्स मशीनची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यात अनेक मेडिकल स्टोर्समध्ये विविध कंपन्यांच्या ऑक्सिजन पल्स मीटर मशीन्स उपलब्ध आहेत. मात्र
कंझ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया (CGSI) या ग्राहक हक्क संस्थेने, खुल्या बाजार पेठेतील ४० ऑक्सिमीटर मशीनवर अभ्यास केला, या अभ्यासात कमीतकमी १५ टक्के किंवा त्यापैकी सहा टक्के ऑक्सिमीटर पल्स मशीन निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले आहे. या मशीन्स मानक वैशिष्ट्यांनुसार नव्हत्या. त्याचबरोबर असमान किंमत आणि निकृष्ट्य दर्जाची पॅकिंग केलेल्या होत्या.

ऑक्सिमीटर मशीन बिघाडामुळे अनेक अडचणी 

या अभ्यासात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी खुल्या बाजारात विक्री होत असलेल्या ऑक्सिमीटर पल्स मशीनचे मूल्यांकन करण्यात आले. यावर सीजीएसआयचे मानद सचिव डॉ. मनोहर कामथ यांनी सांगितले की, ४० पल्स ऑक्सिमीटर मशीनच्या नमुन्यांमध्ये मानक वैशिष्ट्यांचे पालन करण्यात आले नव्हते. बर्‍याच इतर ८५ टक्के मशीन्समध्ये अनेक अडचणी येत होत्या.

- Advertisement -

सीजीएसआयने म्हटले आहे की, निकृष्ट दर्जाच्या ऑक्सिमीटर मशीनमुळे रुग्णाला आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी केव्हा खालच्या स्तरावर पोहचेल याची माहिती मिळणार नाही. किंवा या खराब मशीन्समुळे सामान्य ऑक्सिजन पातळी चुकीच्या पद्धतीने दाखवल्यास रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.


 

- Advertisement -