घरमहाराष्ट्रहा तर राज्यपाल म्हणजेच पर्यायानं घटनेचा अवमान, चंद्रकांत पाटलांचा मविआवर हल्लाबोल

हा तर राज्यपाल म्हणजेच पर्यायानं घटनेचा अवमान, चंद्रकांत पाटलांचा मविआवर हल्लाबोल

Subscribe

आता तुम्ही नियमामध्ये बदल करून त्यांच्याकडे तारीख मागताय. पण घटनेप्रमाणे दोनदा त्यांनी तारीख दिली. पण तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नाही. हा राज्यपालांचा म्हणजे पर्यायानं घटनेचा अवमान असतो. या मुद्द्यावरूनही राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते हा घटनेचा अवमान केला. राज्यपाल हे इतकं स्वायत्तपद आहे, त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवावं, असंही चंद्रकांत पाटलांनी अधोरेखित केलंय.

मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. विधानसभा अध्यक्षपदावरून त्यांनी आघाडी सरकारला खडे बोल सुनावलेत. राज्यपालांना जे जे उलटसुलट बोलायचं असतं, त्याचा अधिकार हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. जो अधिकार राज्यपालांचा आहे, त्यावर टिपण्णी करणं बरोबर नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत. चंद्रकांत पाटलांनी विधानसभेच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधलाय. त्यावेळी ते बोलत होते.

आता तुम्ही नियमामध्ये बदल करून त्यांच्याकडे तारीख मागताय. पण घटनेप्रमाणे दोनदा त्यांनी तारीख दिली. पण तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नाही. हा राज्यपालांचा म्हणजे पर्यायानं घटनेचा अवमान असतो. या मुद्द्यावरूनही राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते हा घटनेचा अवमान केला. राज्यपाल हे इतकं स्वायत्तपद आहे, त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवावं, असंही चंद्रकांत पाटलांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

जेवढे गोंधळाचे प्रसंग असतील, त्या सगळ्यांची यादी आहे. त्यातल्याच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार आहेत. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक बरोबर पावणे दोन वर्षांपूर्वी बरखास्त झाली. कोविड आणि ओबीसी आरक्षणामुळे ती स्थगित होत चालली आहे. कोल्हापूर महापालिकाही अशी गेल्या ऑगस्टपासून दीड वर्ष पेंडिंग आहे. कल्याण-डोंबिवली, वसई-विरार प्रलंबित आहे. या सगळ्या निवडणुकांचा सगळा खेळखंडोबा झालाय. सहा जिल्ह्यांचा ओबीसी आरक्षणावरून वाद झाला. ते रद्द झाल्यानंतर तिथे पर्यायी निवडणूक झाली. ती ओपनला झाली. ते होत नाही तोपर्यंत 106 नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय.

कोर्टाच्या आदेशानंतर सगळ्या रदद् करायला हव्या होत्या, त्या निम्म्या केल्या. 106 नगरपंचायतीमध्ये 12-12 जागांच्या निवडणुका झाल्या. ओबीसी आरक्षणाचा गोंधळ, मराठा आरक्षणाचा गोंधळ, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात गोंधळ, शेतकऱ्यांच्या मदतीत गोंधळ झालाय. शाळा आज म्हणणार सुरू करणार आणि उद्या पुन्हा बंद करणार. पेपरफुटी असे जेवढे म्हणून गोंधळ आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

- Advertisement -

सरकार आर्टिफिशियली कसे वापरायचे हे त्यांच्या हातात

नितेश राणे यांच्या अटकेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. सरकार आर्टिफिशियली कसे वापरायचे हे त्यांच्या हातात आहे. लोकशाही संपलेली नाही, आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, बीजेपी समर्थ आहे. नारायण राणे यांनाही दोन मिनिटात जामीन द्यावा लागला होता, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -