घरताज्या घडामोडीST Workers: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचा खंबीर पाठींबा, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

ST Workers: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचा खंबीर पाठींबा, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

Subscribe

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी तसेच एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाला भाजपकडून खंबीर पाठींबा देण्यात आला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन जोरदार निदर्शने केली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचा खंबीर पाठींबा असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने सगळ्यांना वाऱ्यावर सोडले आहे परंतु आम्ही सोडणार नाही असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर घणाघात केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना विचारा आम्ही कोणत्याही आंदोलनामध्ये सहभागी होत नाही. परंतु जर आंदोलकांनी सहकार्य कऱण्यास विचारले तर आम्ही सहभागी होणार आम्ही कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारने सगळ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे ठरवले आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती भीषण आहे. २९ आत्महत्या झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी मोर्चाही काढायाच नाही का? आंदोलन पण करायचे नाही का? रडायचे नाही का? चार हजार महिना पगार मिळाला आहे. सरकारचे कसं झाले आहे काय बोललं नाही, बोललात तर राजकारण करता असे म्हटलं जात आहे. तुम्ही केंद्राकडे बोट दाखवून बोंबाबोंब करत होता मग आता केंद्राने इंधनाचे पैसे कमी केले मग तुम्ही सुद्धा करा असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी बोलणं हे राजकारण असेल तर आम्ही राजकारण करणार, शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलणं म्हणजे राजकारण वाटत असेल तर आम्ही राजकारण करणार असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

विरोधी पक्षामुळे सरकारचे डोकं ठिकाण्यावर राहते

अन्याय अत्याचार वर बोलून राजकारण होणार असेल तर आम्ही राजकारण करणार, ड्रग्जमुक्तीसाठी बोलल्यावर राजकारण होत असेल तर आम्ही राजकारण करणार, विरोधी पक्षात आहोत आम्ही बोलल्यामुळे सरकार ठिकाण्यावर राहते असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कर्मचारी १७ महिन्याचे पगार देण्याची मागणी करत आहेत, बोनस मिळाला पाहिजे. कोविडमध्ये याच कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मदत करण्यात आली होती. एसटी चालू राहिली. जे कोरोना रुग्णालयासाठीचे साहित्य एसटीमार्फत नेण्यात आले यावेळी अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. जर त्याच कर्मचाऱ्यांची मागणी असेल की आम्हाला सरकारी वर्कर करा तर बसून प्रश्न सोडवा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : “एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच, बाहेरचे नाहीत” मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -