घरमहाराष्ट्रनवाब मलिकांविरोधात भाजप युवा मोर्चाचं मंत्रालयाबाहेर आंदोलन

नवाब मलिकांविरोधात भाजप युवा मोर्चाचं मंत्रालयाबाहेर आंदोलन

Subscribe

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर भाजप आक्रमक झालं आहे. भाजप युवा मोर्चाने नवाब मलिक यांच्याविरोधात मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. तसंच, नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना १४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकलं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेत नवाब मलिक यांच्याविरोधात मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं आहे. मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसंच, नवाब मलिक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध केला.

- Advertisement -

नवाब मलिकांचा फडमवीसांवर ‘हायड्रोजन बॉम्ब’

१४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटा ज्या पकडण्यात आल्या. त्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकला. बीकेसीमध्ये (८ ऑक्टोबर २०१७) बोगस नोटांचे कनेक्शन आयएसआय, पाकिस्तान व्हाया बांग्लादेश यांच्यामार्फत बोगस नोटा संपूर्ण देशात पसरवल्या गेल्या. ८ ऑक्टोबरच्या छापेमारीत १४ कोटी ५६ लाख पकडण्यात आले. मुंबईत एकाला अटक झाली. एकाला पुण्यात अटक करण्यात आली. त्यामध्ये इम्रान आलम शेख, रियाज शेख यांची अटक झाली. नवीमुंबईमध्येही कारवाई झाली. पंरतु १४ कोटी ५६ लाख बोगस नोटांमधून ८ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले.

पाकिस्तानची बोगस नोट भारतात चालावी? प्रकरण दाखल होते आणि काही दिवसातच जामीन मिळतो. हे प्रकरण NIA कडे दिले जात नाही. नोटा कुठून आल्या. याची अंतिम चौकशी झाली नाही. कारण जे बोगस नोटांचे रॅकेट चालवत होते, त्यांना तत्कालिन सरकारचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -