घरमहाराष्ट्रChandrapur Constituency : उमेदवारी जाहीर होण्याआधीच फेसबुक पोस्ट, मात्र दिल्लीतून काहीच बातमी...

Chandrapur Constituency : उमेदवारी जाहीर होण्याआधीच फेसबुक पोस्ट, मात्र दिल्लीतून काहीच बातमी नाही

Subscribe

चंद्रपूर : काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक बुधवारी (20 मार्च) नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत काही उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्याआधीच चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाची चर्चा होताना दिसत आहे. कारण दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात या मतदारसंघात स्पर्धा सुरू आहे. अशातच आता उमेदवारी निश्चित होण्याआधीच प्रतिभा धानोरकर यांनी फेसबुक पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Chandrapur Constituency Facebook post even before the announcement of candidature but there is no news from Delhi)

हेही वाचा – Stock Market : शेअर बाजारात ‘बबल’; सेबीनंतर आता आरबीआयकडूनही चिंता व्यक्त

- Advertisement -

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी चंद्रपूर-आर्णी लोकसभेची मोठी चर्चा होताना दिसत आहे. कारण याठिकाणी 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर विजयी झाल्यामुळे भाजपाला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. विशेष म्हणजे काँग्रेसच्या एका विजयाने भाजपाचे राच्य काँग्रेसमुक्त करण्याचे स्पप्न भंगले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपाने विजयासाठी कंबर कसली असून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र दुसरीकडे प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार हे या मतदारसंघासाठी आमनेसामने आले आहेत.

- Advertisement -

चंद्रपूर लोकसभेवर कोणीही दावेदारी केली तरी पहिला हक्क माझा आहे, अशी भूमिका प्रतिभा पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मांडली होती. त्यांनी असेही म्हटले होते की, मी काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी माझे सगळं ऐकून घेतले असून ते या संदर्भात सकारात्मक आहेत. मात्र काँग्रेसमध्ये वेळेपर्यंत कुठलाही निर्णय होत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप कुठलीही यादी जाहीर झाली नसल्याने मी सध्या याबाबत काही सांगू शकत नाही. मात्र काहीही झाले तरी मीच काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असा पुनरुच्चार प्रतिभा धानोरकर यांनी केला होता.

हेही वाचा – Pune Crime : पुण्यात गोळीबाराचे सत्र सुरूच; क्रिकेट खेळताना वाद झाला अन्…

विजय वडेट्टीवार यांनीही चंद्रपूर-आर्णी येथून लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे त्यांची कन्या आणि प्रदेश युवक महिला काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनीही या मतदारसंघातून निवडणक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवारीचा घोळ वाढला असतानाच बुधवारी नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा सुरू झाली.  याशिवाय प्रतिभा धानोरकर यांनीही 2019 ची पुनरावृत्ती यंदाही होणार, अशी फेसबुकवर पोस्ट करीत ‘आपणच उमेदवार असू’ असे सूचक संकेत दिले. त्यामुळे धानोरकर समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तसेच धानोरकर यांना उमेदवारी देऊन त्यांना दिल्लीवरून तयारीला लागण्याचा निरोप आला का? अशीही चर्चा चंद्रपूरमध्ये सुरू झाली. मात्र तासाभरातच विजय वडेट्टीवार यांचेही नाव पुढे आले. मात्र काँग्रेसने अद्याप कोणाचंही नाव अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. त्यामुळे उमेदवारीची माळ कुणाचा गळ्यात पडेल हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -