घरमहाराष्ट्रBacchu Kadu : आम्ही आमचा झटका दाखवू आणि वेळ पडल्यास...; बच्चू कडूंचा...

Bacchu Kadu : आम्ही आमचा झटका दाखवू आणि वेळ पडल्यास…; बच्चू कडूंचा महायुतीविरोधात शड्डू

Subscribe

अमरावती : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे महायुतीचे घटक असूनही मागील काही काळापासून सातत्‍याने सरकारच्‍या विरोधात भूमिका मांडत आहेत. अशातच प्रत्‍येक मतदारसंघात ‘मी खासदार’ हे अभियान राबवून 300 ते 400 उमेदवार उभे करणार असल्‍याची घोषणा बच्‍चू कडू यांनी केली आहे. याशिवाय आज त्यांनी अमरावती विभागातील प्रहारची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी लोकसभेमध्ये महायुतीसोबत राहायचं की नाही याचा निर्णय बच्चू कडू घेणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळाचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. (Well show our chops and bang if time permits Bachu Kadus Shaddu against Mahayuti)

हेही वाचा – Pune Crime : पुण्यात गोळीबाराचे सत्र सुरूच; क्रिकेट खेळताना वाद झाला अन्…

- Advertisement -

बैठकीबद्दल सांगताना बच्चू कडू म्हणाले की, आम्हाला राज्यभरातून आमच्या कार्यकर्त्यांचे फोन येत होते. महायुतीत आपल्याला कुठल्याही प्रकारची विचारणा होत नाही, आपल्याला केवळ मतांपुरतं गृहित धरलं जात आहे. आपण त्याचा बदला घेतला पाहिजे. आपण निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे, अशी मतं आमच्या कार्यकर्त्यांनी मांडली. याशिवाय राज्यात प्रहारची ताकद असूनही आम्हाला निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने वागवलं जात आहे, जे चुकीचं आहे. जर आमच्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळत नसेल तर आम्ही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा आणि कसा घ्यायचा हे आजच्या बैठकीत ठरवणार आहोत. वेळ पडल्यास प्रत्येक मतदारसंघात आमचा उमेदवार उभा करू. शेतकरी, मजूर, गोरगरिब, वंचित आणि दलितांची मदत करणारा एखादा कणखर उमेदवार असेल तर आम्ही त्याच्या पाठिशी उभे राहू, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

महायुतीविरोधात बंड करणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर बच्चू कडू म्हणाले की, आमची त्यांना सहाय्य करण्याची तयारी होती. परंतु त्यांनाच आम्ही त्यांच्यासोबत नको आहोत, असं एकंदरीत दिसतं आहे. जर त्यांना आम्ही नका आहोत, तर त्यांना आता आम्ही आमचा झटका दाखवू आणि वेळ पडल्यास दणकाही देऊ, अशा इशारा देतनाच बच्चू कडू म्हणाले की, आमचे कार्यकर्ते फोन करून सांगत आहेत की, त्यांना मतदारसंघात कुठलीही विचारणा होत नाही. त्यामुळे आता आम्हालाही त्यांची गरज नाही. आम्ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नाही. राज्यात आमची स्वतंत्र ताकद आहे ती दाखवून देऊ. वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू आणि प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करू. परंतु, अद्याप तशी वेळ आलेली नाही, असेही बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठी बोलताना स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Nitesh Rane : …तर त्यांना रोज औरंगजेब आठवेल; मोदींवरील राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचे प्रत्युत्तर

दरम्यान, बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पार्टीने अमरावती येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तर 29 मार्चला नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आणि 30 मार्च रोजी औरंगाबाद, बीड, जालन्याची बैठक होणार आहे. याशिवाय मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात नियोजन करण्यासाठीही बैठका होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -