घरमहाराष्ट्रऔषध विक्रेत्यांचा संप, मध्यरात्रीनंतर शटर डाऊन

औषध विक्रेत्यांचा संप, मध्यरात्रीनंतर शटर डाऊन

Subscribe

सर्वसामान्य रुग्णांचा विचार करून केमिस्ट आणि फार्मासिस्टनी संप करू नये, असं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे.

ई-फार्मसीविरोधात राज्यातील केमिस्ट, फार्मासिस्ट आणि राज्यातील औषध विक्रेते देशव्यापी संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारकडून ई-फार्मसीचा ठोस मसुदा तयार करण्यात आला आहे आणि लवकरच तो लागूही करण्यात येईल. केंद्रसरकारच्या याच निर्णयाचा निषेधार्थदेशभरातील लाखो औषध विक्रेते गुरुवारी मध्यरात्री १२ पासून एकदिवसीय संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यक औषधं गुरुवारी मध्यरात्रीपूर्वीच खरेदी करावीत, असं आवाहन सर्व विक्रेत्यांनी केलं आहे. मात्र, दुसरीकडे सर्वसामान्य रुग्णांचा विचार करून केमिस्ट आणि फार्मासिस्टनी संप करू नये, असं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान केलं आहे. ‘औषध ही जीवनावश्यक वस्तू आहे. त्याच्या तुटवड्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. आपल्या मागणीसाठी औषध विक्री बंद करुन सर्वसाधारण रुग्णांना आणि जनतेला वेठीस धरणे योग्य नाही अशी भावना बापट यांनी परिपत्रकामध्ये व्यक्त केली आहे. याशिवाय ‘सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी औषध विक्री आणि वितरण सुरू ठेवा’, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

माणुसकीच्या दृष्टीकोनातून काही मुख्य हॉस्पिटलच्या बाहेर २४ तास असणारे मेडिकल्स आम्ही सुरू ठेवणार आहोत. आम्हालाही रुग्णांना किंवा सर्वसामान्यांना वेठीस धरायचे नाही. त्यामुळे या संपात सर्व सहभागी तर होतील पण काही दुकानं मात्र सुरू राहतील. – कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसी असोसिएशन

- Advertisement -

संपाचे कारण काय? 

कैलास तांदळे यांनी सांगितल्यानुसार, ‘केंद्र सरकाराने परवानगी दिलेल्या ई-फार्मसीवर भविष्यात कुणाचेच नियंत्रण राहणार नाही. औषधांच्या ऑनलाईन विक्रीमुळे त्यांचा दर्जाही राखला जाणार नाही. याशिवाय ई-फार्मसीमुळे बेकायदेशीर व्यापार वाढण्याची शक्यता बळावू शकतो. त्यातच औषध विक्रेते संघटनांनी ‘२०१३ सालापासून आजपर्यंत औषध दुकानात काम करणाऱ्या अशिक्षित व्यक्तींना पाच वर्षे अनुभव असल्यास फर्मासिस्टसचा दर्जा द्या’ अशी मागणी संपादरम्यान केली होती. त्यामुळे आज म्हणजेच २७ सप्टेंबर २०१८ पर्यंत मालक फर्मासिस्ट आपल्या शर्टावर काळ्या फिती लावून औषध दुकानात काम करत आहेत.’


वाचा: सौदी अरेबियात महिला ‘अँकरने’, रचला इतिहास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -