घरक्रीडाKorea Open : सायना नेहवालची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Korea Open : सायना नेहवालची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Subscribe

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने कोरिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीत सायनाने कोरियाच्या किम ग इऊनचा पराभव केला.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने कोरिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीत सायनाने कोरियाच्या किम ग इऊन हिचा २१-१८, २१-१८ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. याआधी सलामीच्या सामन्यात सायनाने कोरियाच्याच किम ह्यो मिनचा पराभव केला होता.

असा झाला सामना 

सायनाने उप-उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याची सुरूवात चांगली केली. तिने पहिल्या सेटच्या सुरूवातीला १०-२ अशी आघाडी घेतली. पण यानंतर किमने चांगला खेळ केला. त्यामुळे या सेटच्या मध्यंतरापर्यंत सायनाकडे ११-८ अशी अवघी ३ गुणांची आघाडी होती. यानंतरही दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. या सेटमध्ये दोघींमध्ये १८-१८ अशी बरोबरी होती. सायनाने पुढचे तिन्ही गुण मिळवत पहिला सेट २१-१८ असा जिंकला. दुसऱ्या सेटची आक्रमक सुरूवात करत किमने ८-१ अशी मोठी आघाडी मिळवली. पण सायनाने आपला अनुभव पणाला लावत या सेटमध्ये पुनरागमन केले. त्यामुळे तिने किमची आघाडी १०-१३ अशी कमी केली. तर यापुढचे सलग ८ गुण मिळवत सायनाने या सेटमध्ये १८-१३ अशी आघाडी मिळवली. अखेर सायनाने हा सेट २१-१८ असा जिंकत सामनाही जिंकला. त्यामुळे तिने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

उपांत्यपूर्व फेरीत ओकुहराशी सामना

उपांत्यपूर्व फेरीत सायनाचा तिसऱ्या सीडेड नोझोमी ओकुहराशी होणार आहे. या दोघींमध्ये आतापर्यंत ९ सामने झाले आहेत. ज्यात सायनाने ६ तर ओकुहराने ३ सामने जिंकले आहेत. पण या दोघींमधील मागील दोन्ही सामने ओकुहराने जिंकले आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -