घरमहाराष्ट्रचेतक एंटरप्रायजेसची होणार चौकशी

चेतक एंटरप्रायजेसची होणार चौकशी

Subscribe

सदर प्रकल्पामुळे परिसरातील नागरीकांना धुळीचा व आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकरणी कंपनीची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील चेतक एंटरप्रायजेसच्या प्रकल्पासंदर्भात आलेल्या तक्रारीसंबंधी चौकशी करुन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करणार असल्याची माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. या बाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली होती. त्यावेळी पोटे-पाटील बोलत होते.

काय म्हणाले पोटे

यावेळी पोटे-पाटील म्हणाले, मे. चेतक एंटरप्राईजेस लि. यांच्या सदर प्रकल्पामुळे परिसरातील नागरीकांना धुळीचा व आवाजाचा त्रास होत असल्याबाबतच्या मुख्याधिकारी, माणगांव नगरपंचायत यांच्याकडे प्राप्त तक्रारी त्यांच्याकडून दि. २०.११.२०१८ रोजीच्या पत्रान्वये उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाड, जि. रायगड यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत सदर प्रकल्पास दि.२२. ११.२०१८ रोजी समजपत्र देण्यात येऊन दि. २८.११.२०१८ रोजी प्रकल्प बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -