घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal : "सर्वेक्षणावेळी फक्त जात विचारली जाते", छगन भुजबळांची टीका

Chhagan Bhujbal : “सर्वेक्षणावेळी फक्त जात विचारली जाते”, छगन भुजबळांची टीका

Subscribe

नाभिक समाजाबद्दल केलेले वक्तव्य हे मोडून तोडून दाखवला, अशा आरोप राज्याचे मंत्री

मुंबई :  ‘सर्वेक्षणावेळी फक्त जात विचारली जाते. 180 प्रश्न आहेत, यासाठी जवळपास दीड तास लागतो. पण तरीही फक्त जात विचारली जाते आणि बाकीचा फॉर्म भरला जातो, अशी टीका अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वेक्षणावर केली आहे. सत्ताधारी आमदार लाथा घालण्याची भाषा करू लागल्यानंतर राजीनाम्याबद्दल बोललो, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी राजीनाम्यावर केले आहे.

सर्वेक्षणावर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले, “ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करणे शक्य आहे का? 180 प्रश्न आहेत, एका घराचे सर्वेक्षण करण्यासाठी दीड तास लागतो, तर 8 आणि 10 तासांत पाच-सात सर्वेक्षण होतील. पण इथे 50 घरांचे सर्वेक्षण केल्याचे जाते आहे. यात फक्त लोकांना जात विचारली की, बाकीच्या 179 सर्व प्रश्नांची उत्तरे ही आपोआप भरली जात आहे. अशा प्रकारे सर्व्हे केला जात आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावण्याने उद्धव ठाकरे संतापले; सुनावले खडेबोल

सत्ताधारी आमदार लाथा घालण्याची भाषा करतात…

राजीनामा दिल्यानंतर तो का स्वीकारला नाही, याबाबत आता चर्चा सुरू आहे? या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “मी 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला. त्यावेळी कोणालाच माहिती नव्हते की, मी काय करणार आहे. एकानेही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. मी स्वत:हून 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला. कारण मला 17 नोव्हेंबरला अंबडमध्ये ओबीसीच्या रॅलीमध्ये माझी भूमिका मांडायची होती. त्यावेळी मला वाटले होते की, आपण आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलेले बरे होईल. यानंतर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण मला सांगितले की, तुम्ही शांत रहा आणि राजीनाम्याची कुठेही वाच्यता करू नका. मी दौऱ्यावरून परत आल्यानंतर मला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, तुम्ही तुमची भूमिका मांडा पण राजीनाम्याबद्दल कुठेही वाच्यता नका. त्यामुळे मी शांत राहिलो, यानंतर विरोधकांनी माझ्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळीही मी शांत बसलो होतो. पण सत्तेतील आमदार कमरेत लाथ घालण्याची भाषा लागले, तर लोक काय म्हणतील? छगन भुजबळ लोचट आहे. त्यामुळे मी स्वत: हून मंत्री पदाचा राजीनाम्याबद्दल बोललो.”

- Advertisement -

हेही वाचा – Paytm Stocks : आरबीआयच्या निर्बंधांनंतर पेटीएमचे शेअर्स 10 टक्क्यांनी कोसळले; गुंतवणुकदारांना मोठा फटका

नाभिक समाजाबद्दल केलेले वक्तव्य मोडून तोडून दाखवले

नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली जाते. यावर छगन भुजबळ म्हणाले, “काही लोकांनी, चॅनेलने चुकीची गोष्ट दाखवली आहे. माझ्याकडे आजही त्यांची क्लीप आहे. ती क्लीप मी तुम्ही सर्वांना देऊ शकतो. एका गावात गेलो होत, त्या गावातल्या नाभिक समाजाच्या माणसाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यामुळे त्या गावातील मराठा समाजाने त्याच्या दुकानावर बहिष्कार टाकला. मी म्हटले की, तुम्ही त्याच्या दुकानावर बहिष्कार टाकला, त्या गावातील सर्व नाभिक समाजाने जर तुमच्यावर बहिष्कार टाकला. मग तुम्ही काय एकमेकांचे केस कापणार का? हा माझा प्रतिसवाल होता. माझे वक्तव्य हे एका गावापुरते होते. पण माझे वक्तव्य हे मोडून तोडून सगळीकडे दाखवण्यात आले”, असा आरोप छगन भुजबळांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -