घरमहाराष्ट्रपवारांचे माझ्यावर आतोनात प्रेम, भुजबळांची शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यावर प्रतिक्रिया

पवारांचे माझ्यावर आतोनात प्रेम, भुजबळांची शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यावर प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर छगन भुजबळसुद्धा नाशिक दौऱ्यावर मतदारसंघात दाखल झाले आहेत. पवारांनी नाशिकच्या येवल्यातून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. पवारांच्याविरोधात भूमिका घेतलेल्यांमध्ये भुजबळसुद्धा आहेत. माझ्यावर आतोनात प्रेम असल्यामुळे शरद पवार नाशिकमध्ये आले आहेत अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. पक्षातील आमदारांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे पुन्हा पवारांनी पक्ष वाढीसाठी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून हा दौरा नाशिक येथून सुरु झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार नाशिकमधून दौऱ्याला सुरुवात करत आहेत असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, त्यांचे कारण असं आहे, पवारांचे माझ्यावर आतोनात प्रेम आहे. दुसरं अस आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला तेव्हा पहिला नेता उभा राहिला तो छगन भुजबळ त्यानंतर बाकिचे आले. त्यामुळे सहाजिकच आहे. मी त्यांच्याबर पहिला होतो. म्हणून माझा पहिला नंबर असल्याचे भुजबळांनी सांगितले.

- Advertisement -

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा नाशकात

मंत्री छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले. कार्यकर्त्यांनी भुजबळांचे जंगी स्वागत केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसुद्धा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. पवारांची येवल्यात सभा होणार आहे. या सभेपूर्वीच भुजबळांनी पवारांच्या दौऱ्याला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानले आहेत. मी या नाशिककर जनतेचा मनापासून अभारी आहे. आपण पाहतो आहोत की, ठाणे, कल्याण, भिवंडी अनेक ठिकाणी कार्यकर्ते, बांधव आणि भगिणी हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याचा अर्थ असा आहे की, जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही घेतलेला निर्णय पसंत पडला आहे. त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे. ठाणे ते नाशिक या रस्त्यालासुद्धा अशीच गर्दी होती.


हेही वाचा : Sharad Pawar : ‘त्या’ आता चिमण्या राहिल्या नाहीत; शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -