घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal : राज ठाकरेंच्या युतीतील सहभागावर भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Chhagan Bhujbal : राज ठाकरेंच्या युतीतील सहभागावर भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

मुंबई : मनसे अध्यक्ष हे काही तासांमध्ये युतीत सहभागी होण्याची घोषणा करणार आहेत. आज (ता. 19 मार्च) साधारणतः अर्धा तास राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये बैठक झाली. अमित शहा यांच्या दिल्लीतील घरी ही चर्चा झाली. त्यामुळे आता मनसे युतीत सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत आता युतीतील प्रमुख नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज ठाकरे युतीत आल्यानंतर महायुतीची ताकद वाढेल, असे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. याचबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. (Chhagan Bhujbal reaction to Raj Thackeray participation in alliance)

हेही वाचा… Thackeray group : …म्हणून ही वाट स्वीकारली, बाळासाहेबांच्या त्या वक्तव्यावर ठाकरे गटाचा खुलासा

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की, राज ठाकरेंना जर बरोबर घ्यायचे असेल तर काही जागा सोडाव्या लागतील. महाविकास आघाडीतही वंचितची चर्चा सुरुच आहे. एकदा वरुन जागावाटप ठरले की बाकी सगळ्या चर्चा थांबतात. राज ठाकरे आमच्या बरोबर आले तर स्वागत आहे. राज ठाकरे आल्याने महायुतीची शक्ती वाढेल. विधानसभेलाही, महापालिकेलाही हे नाते आणि संबंध उपयोगी पडतील. राज ठाकरे येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे.

तसेच, शिवसेना आणि भाजपा या दोन्हींचा विचार हिंदुत्वाचा आहे. आमचा पक्ष त्यांच्या युतीत आहे. त्यांच्या पक्षात आम्ही आमचा पक्ष विलीन केलेला नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गावरच आम्ही चालतो आहोत. समाजातली चांगली प्रवृत्ती कोण? अपप्रवृत्ती कोण हे लोकांना समजते. लोकांना या सगळ्याची जाणीव आहे. कोण काय भाष्य करते याकडे लोक पाहात नाहीत, कोण आपली कामं करतो ते लोक पाहतात. आमचा म्हणजे महायुतीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नक्की आहे. आम्ही महायुती म्हणून मोदींसाठी काम करतो आहोत. पण काम करताना भाषेवर ताबा ठेवला पाहिजे, असा छगन भुजबळ यांच्याकडून सोबतच्या नेत्यांना देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -