घरमनोरंजनपापाराझींसोबत श्रद्धाने केली पिझ्झा पार्टी; व्हिडीओ व्हायरल

पापाराझींसोबत श्रद्धाने केली पिझ्झा पार्टी; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

श्रद्धा कपूर बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक असून, तिचा चाहतावर्ग मोठा आहे यात शंका नाही. श्रद्धाच्या साधेपणाचे नेहमीच चाहते कौतुक करताना दिसतात. अनेकदा सोशल मीडियावर श्रद्धा विविध पदार्थ खात असतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता श्रद्धाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एका इव्हेंटमध्ये पोहोचलेली श्रद्धा अचानक पिझ्झा खायला गेल्याचं दिसत आहे.

पापाराझींसोबत श्रद्धाने केली पिझ्झा पार्टी

इव्हेंटमध्ये फोटो काढत असताना श्रद्धाचं लक्ष पापाराझींकडे गेलं. यावेळी पापाराझी एकत्र पिझ्झा पार्टी करत होते. पापाराझींच्या पिझ्झा पार्टीत श्रद्धा कपूरही सामील झाली. यावेळी श्रद्धा म्हणाली की तिला खूप भूक लागली आहे. यावेळी पापाराझींनी तिझ्याहातात पिझ्झा बॉक्स दिला. त्यानंतर पापाराझींनी तिला पिझ्झा, ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स देखील दिले. हे सर्व घेऊन श्रद्धा तिथून निघून गेली.

- Advertisement -

दरम्यान, आता सोशल मीडियावर श्रद्धा कपूर पापाराझींकडून पिझ्झा मागतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांना श्रद्धाची डाउन टू अर्थ वागणूक खूप आवडली. अनेकजण तिच्या साधेपणाचं खूप कौतुक करताना दिसत आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

Prasad Oak : प्रसाद ओककडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला पार्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -