घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरVideo : निधीवाटपावरून दोन नेत्यांमध्ये वाद…: अंबादास दानवे म्हणतात...“स्वतःची जहागिरी…”

Video : निधीवाटपावरून दोन नेत्यांमध्ये वाद…: अंबादास दानवे म्हणतात…“स्वतःची जहागिरी…”

Subscribe

औरंगाबाद : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निधी वाटप केले. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांना निधी मिळाला नाही. त्यामुळे निधी वाटपाचा मुद्दा अधिवेशनात प्रचंड गाजला. नुकतेच अधिवेशन संपले पण निधी वाटपाचा मुद्दावर अजूनही वाद होताना दिसत आ. औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत (District Planning Committee Meeting) आज (7 ऑगस्ट) निधीवाटपावरून दोन नेत्यांमध्ये जोरदार वाद समोर आला असून या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यात भर बैठकीत जोरदार राडा समोर आला आहे. (Video Controversy between two leaders over fund allocation Ambadas Danve says Self serving)

विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा, तसेच कमी निधी दिला जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. यानंतर पणनमंत्री अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी अंबादास दानवेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना चढ्या आवाजात प्रत्युत्तर दिले. त्यामुळे भुमरे आणि दानवेंमध्ये शाब्दिक वाद झाला. ते दोघे एकमेकांच्या अंगावर धावून देखील गेले. या दोन्ही नेत्यांच्या भांडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर मी राज ठाकरेंशी चर्चा करण्यास तयार; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

पालकमंत्री स्वतःची जहागिरी असल्यासारखे वागत आहेत

बैठकीत झालेल्य वादानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे स्वतःची जहागिरी असल्यासारखे पालकमंत्री वागत असतील तर, त्यांच्याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. निधी मिळत नाही, ही माझी एकट्याची भूमिका नाही, तर सत्ताधारी आमदारांनाही तसंच वाटत होतं. मी त्यांचीही भूमिका मांडली. आमदार रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार, अतुल सावे, हरीभाऊ बागडे या सगळ्याच आमदारांना तसं वाटत होतं. मी फक्त ती भूमिका आक्रमकपणे मांडली. पालकमंत्री म्हणत असतील सगळ्या तालुक्यांना सारखाच निधी दिला आहे. परंतु तालुक्यांमधील लोकसंख्येच्या निकषावर निधीचं वाटप होत असतं, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.

- Advertisement -

ठाकरे गटाच्या निधीबद्दल बोलण्यापेक्षा…

दरम्यान, पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीतील वादावर बोलणं टाळलं. ते म्हणाले की, ठाकरे गटाच्या आमदारांना किती निधी दिला, यावर बोलण्यापेक्षा तालुक्यांना किती निधी दिला ते बोलणे महत्त्वाचं आहे. प्रत्येक तालुक्याला किती निधी दिला ते पाहा. जितका निधी वैजापूर, सिल्लोड आणि गंगापूर या तीन तालुक्यांना दिला आहे, तितकाच निधी कन्नड तालुक्यालाही दिला आहे. सगळ्या तालुक्यांना सारखा निधी दिला आहे, असे संदिपान भुमरे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कन्नड मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत (ठाकरे गट) यांनी आरोप केला की, पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत. याच मुद्द्यावरून अंबादास दानवे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी निधीवाटपाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. यानंतर औरंगाबादचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संदिपान भुमरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी अंबादास दानवे हे संदिपान भुमरेंच्या अंगावर धावून गेले. एवढं होऊनही भुमरे मोठ्या आवाजात दानवेंना प्रत्युत्तर देत होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -