घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरSandeepan Bhumre : कोट्यवधींचे धनी; मंत्रीपदाच्या कार्यकाळात भुमरेंच्या संपत्तीत अडीच पटीने वाढ

Sandeepan Bhumre : कोट्यवधींचे धनी; मंत्रीपदाच्या कार्यकाळात भुमरेंच्या संपत्तीत अडीच पटीने वाढ

Subscribe

संदीपान भुमरेंच्या संपत्तीत गेल्या 4 वर्षात अडीचपटीने वाढ झाली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असले तरी उर्वरीत मतदारसंघात उमेदवार आपले अर्ज भरताना दिसत आहे. यावेळी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रावरून त्यांची संपत्तीचा आकडाही समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच लागली होती. नुकतेच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांना याठिकाणी उमेदवारी घोषित करण्यात आली. यानंतर आता भुमरेंनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीत गेल्या 4 वर्षात अडीचपटीने वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Lok Sabha Election 2024 Sandipan Bhumres wealth increased two and a half times during his tenure as a minister)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची संपत्ती 2019 साली 2 कोटी होती, मात्र गेल्या 4 वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या संपत्तीत तब्बल अडीच पटींनी वाढ झाली आहे. भुमरेंची संपत्तीत सत्तेत गेल्यापासून मात्र मागील चार वर्षांत झपाट्याने वाढली आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंची संपत्ती जैसे थे आहे. भुमरेंकडे 28 लाखांची फॉर्च्यूनर कार आहे. याशिवाय 45 तोळे सोने आहे. भुमरेंच्या मालमत्तेचे बाजारमूल्य 5.70 कोटींच्या वर आहे. असे असले तरी चंद्रकांत खैरे हे भुमरेंपेक्षा अधिक श्रीमंत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Bacchu Kadu : हनुमानाने…; अमित शहांच्या सभेचा मंडप कोसळल्याने बच्चू कडूंची खोचक टीका

उमेदवारी अर्ज सादर करताना चंद्रकांत खैरे यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. त्यांनी स्वतःच्या नावावर असलेली व 1979 साली खरेदी केलेली 20 हजारांची फियाट कार तर पत्नीच्या नावे सफारी कार दाखवली आहे. सफारी कारची किंमत 50 हजार आहे. याशिवाय चंद्रकांत खैरे यांच्याकडे 43 तोळे सोने आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि एमआयएमकडून इम्तियाज जलील मैदानात आहेत. यामुळे यंदाची छत्रपती संभाजीनगरमधील निवडणूक चुरशीची होणार यात वाद नाही.

- Advertisement -

शाहू महाराजांची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात (Shahu Maharaj’s wealth is in hundreds of crores)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या संपत्तीचे आकडे समोर येत आहेत. साताऱ्यातील राजघराण्याचे वारसदार छत्रपती उदयनराजे भोसलेंही संपत्ती अब्जावधीच्या घरात आहे. तर कोल्हापूर मतदारसंघातील गादीचे वारसदार शाहू महाराज यांची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात आहे. शाहू महाराजांची संपत्ती 297 कोटी असल्याचे शपथ पत्रातून समोर आले आहे.

हेही वाचा – MNS : महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचारी उमेदवारांसाठी…; शालिनी ठाकरेंनी महायुतीला सुनावले

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -