घरमहाराष्ट्रटाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Subscribe

टाटा एअरबस या प्रकल्पासंदर्भातील सर्व करार एका वर्षांपूर्वीच झाले होते. पण आता पुढील काही प्रकल्प महाराष्ट्रात यावे या साठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता तो गुजरातला गेल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला. वेदांता-फॉक्सकॉन नंतर आता टाटा एअरबस हा प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात टीका टिप्पणीचं सत्र सुरु झालं आहे. भाजप सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टार्गेट करत प्रत्त्युत्तर दिले आहे. या संदर्भांत शिंदे गटाकडून म्हणेजच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

टाटा एअरबस या प्रकल्पासंदर्भातील सर्व करार एका वर्षांपूर्वीच झाले होते. पण आता पुढील काही प्रकल्प महाराष्ट्रात यावे या साठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असे शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा –  जागा 1 उमेदवार 35; गुजरातमध्ये काँग्रेसच्या जागेवर भाजपचा दावा, एवढे महत्त्व कशासाठी?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून टाटा एअरबस हा 22 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातील नागपूर मधून गुजरातमध्ये गेला याच मुद्द्यावरून राज्यात शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून सडकून टीका कारण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान यापूर्वी 1 लाख 66 हजार कोटी रुपयांचा वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क असे महाराष्ट्रातील दोन मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. यावरुनसुद्धा विरोधकांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. पण त्यावेळी मात्र यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला देऊ असे आश्वासन केंद्र सकारकडून महाराष्ट्राला देण्यात आले आहे असे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा –  एअरबस प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणार हे वर्षभरापूर्वीच ठरलेले; पण तरीही…- उदय सामंत

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -