घरताज्या घडामोडीअब्दुल सत्तार हे हिरवा साप; ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल

अब्दुल सत्तार हे हिरवा साप; ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल

Subscribe

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा 'छोटा पप्पू' असा उल्लेख केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर ठाकरे गटातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर ठाकरे गटातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. “अब्दुल सत्तार हे हिरवा सापच आहेत. हे हिरवा सापच नसून रंग बदलणारा सरडा आहेत, ते आधी हिरवा साप होते. आता सरडा झाले आहेत, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. (Chandrakant khaire reply to abdul sattar over comment on aaditya thackeray)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते आदित्य ठाकरे यांचा ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख अब्दुल सत्तारांनी केल्यानंतर ठाकरे गट प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच, पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी सत्तारांवर टीकास्त्र सोडले आहे. “सत्तार भाजपमध्ये आले. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना घेण्यास विरोध केला. मेळावा घेऊन विरोध केला. तुम्ही आमच्याकडे त्याला ढकललं. त्याबदल्यात आम्हाला एक जागा एक्स्ट्रा दिली. उद्धव ठाकरेंनी त्यांना स्वीकारलं. निवडूनही आणलं. एवढं झाल्यावर भाजपचे कार्यकर्ते म्हणतात ते हिरवा साप आहे. म्हटले हो. आता ही त्यांना सिल्लोडमध्ये जाऊन हिरवा सापच म्हणेल. ते सापच नाही तर रंग बदलणारा सरडा आहेत. माझ्या या विधानाशी मुस्लिम बांधवही सहमत आहेत. कारण सत्तार यांनी मुस्लिमांची जमीन हडप केली आहे”, असा आरोप करत चंद्रकांत खैरेंनी सत्तारांवर टीका केली आहे.

- Advertisement -

“आम्ही त्यांना सोडणार नाही ठाकरे घराण्याला काही बोलत असतील तर आम्ही कसे ऐकून घेणार? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगणार नाही. शिंदेच्या हातात काही नाही. त्यांचं फक्त याच्या घरी जा, त्याच्या घरी जा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे जुने मित्र आहेत. त्यांना सांगीन यांना काढून टाका. त्यांचा राजीनामा घ्या. फडणवीस यांना सवाल आहे. तुम्ही हे का सहन करता? तुम्हाला ही बेशिस्त आवडते का? तुमचे मंत्री असे असतील तर तुमच्या सरकारचे नाव खराब होत आहे. अशा मंत्र्यांना किक आऊट करा”, असेही खैरेंनी म्हटले.

याशिवाय, “आम्ही आता शिवरायांसमोर शपथ घेतली. सत्तार यांना गाडणार. त्यांना येऊच देणार नाही. मुसलमानांच्या जमिनी हडपल्या. माझ्याकडे कागदपत्रे आहेत. त्यांनी शाळेतील लोकांची खोटी कामे केली आहेत”, असेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -