घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भावना गवळी म्हणाल्या; "ठाकरेंनी फडणवीसांबरोबर..."

उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भावना गवळी म्हणाल्या; “ठाकरेंनी फडणवीसांबरोबर…”

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आणि ईडी थांबली, अशी टीका शिवेसना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर केली होती. उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीच्या सभेतून त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भावना गवळींनी प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळी प्रत्युत्तर देताना म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंनी भावा-बहिणींच्या पवित्र नात्यावर सतत वक्तव्य केले आहे. कदाचित उद्धव ठाकरेंनी भावा-बहिणींचे नात्याचे महत्वे कळत नसेल, कळाले असते, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे भांडणे कधीच संपले असते. पण, उद्धव ठाकरेंनी त्यासंदर्भात निर्णय घेतला नाही. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांबरोबर गद्दारी केली.”

- Advertisement -

पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले

“खासदार म्हणून मी पाच वेळा निवडून आले आहे. माझ्या मतदारसंघात 24 वर्षांपासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविला आहे. मी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांना राखी बांधली आहे. तसेच मी पंतप्रधान मोदींनाही राखी बांधली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंनी बंधनाबद्दल तर बोलू नये. मी उद्धव ठाकरेंना कधीही बंधन पाळले नाहीच. त्यामुळे आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

हेही वाचा – ‘डबल इंजिन सरकार… त्यामध्ये आणखी एक डबा लागलाय अजित दादांचा’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

- Advertisement -

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले

“तुम्हाला गेल्या वर्षीची रक्षाबंधन आठवते का?, पंतप्रधानांना राखी बांधतानाच एकच फोटो आला होता. पंतप्रधानांना राखी बांधल्यानंतर ईडीची चौकशी थांबली”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भावना गवळींवर केली होती.

NDA चा आता अमिबा झालाय

“काही दिवसांमध्येच आपली मुंबईत बैठक होत आहे. ‘इंडिया’ची बैठक होत आहे. ही बैठक विरोधकांची नसून देशभक्तांची बैठक आहे. भारतमातेचे चित्र ठेवलं आहे ते उगाचच नाही. आम्ही इंडिया म्हणून एकत्र आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके घसरले की, इंडियाचा उल्लेख घमेंडिया केला. मग आम्हीही तुम्हाला घमेंडिये म्हणतो. पण आता जो NDA म्हणून शिल्लक आहे. त्याला काही आकार उकार आहे. NDA चा आता अमिबा झालाय. इतर पक्ष तोडून तुम्ही NDA करतात”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी NDA वर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -