Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Sakinaka Rape Case : चित्रा वाघ यांना अश्रू अनावर, “आम्ही भाषण, घोषणा...

Sakinaka Rape Case : चित्रा वाघ यांना अश्रू अनावर, “आम्ही भाषण, घोषणा देण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही”

Related Story

- Advertisement -

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचं घृणास्पद कृत्य नराधम आरोपीनं केलं होतं. मात्र घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान पीडित महिलेचा मृत्यू झाला. या घटमुळे मुंबईत पुन्हा एकदा महिला असुरक्षित असल्याचे चित्र समोर आले आहे. सर्व स्तरातून या घटनेवर संपप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजपाच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राजावाडी रुग्णालयात मृत महिलेची भेट घेणार होत्या मात्र त्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. यावेळी माध्यमांशी बोलतना चित्रा वाघ यांना अश्रू अनावर झाले. “आम्ही भाषण, घोषणा देण्यापलीकडे काहीही करु शकलो नाहीत. ही हार आहे आमची आणि यायचं मला दु:ख आहे. अशा भावना चित्रा वाघ यांनी व्यक्त केल्या.

“ही हार आहे आमची. आणि याचंच मला दु:ख”

या घटनेवर चित्रा वाघ यांनी संपप्त आणि भावनिक प्रतिक्रिया दिली आहेत. चित्रा वाघ म्हणाल्या की, “खरंतर मी आता निशब्द झाले, माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्द नाहीत. ज्या राक्षसी पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाला, मी तिला बघून आले. मी डॉक्टरांशी आता बोलले, अक्षरश: तिचे आतडे कापले गेले, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. ज्या पद्धतीमध्ये हे अत्याचार चालले ते कुठेतरी थांबायला हवेत. आता आमचे शब्द संपले. महाराष्ट्र महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. हे मला सरकारला सांगायचेय. गेल्या ८ दिवसांमध्ये आपण बघतोय किती अत्याचार झालेत. साडे तेरा वर्षाच्या मुलीवर ठाण्यासारख्या ठिकाणी अत्याचार झाले. आज सकाळीच अमरावतीमध्ये १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, सात महिन्यांची गर्भवती मुलगी तिने गळफास घेऊन स्वतःला संपवून टाकलं.

- Advertisement -

“साकीनाक्यातील महिला मृत्यूशी झुंज देत होती आणि आता तर तुम्ही तिला बघितलं, आम्ही यात काही करु शकलो नाहीत. आम्ही भाषण करण्यापलीकडे, घोषणा देण्यापलीकडे काही करु शकलो नाहीत. याच ज्या पद्धतीने या महिलेला मारले गेले ज्या पद्धतीने या महिलेवर अत्याचार झालेला आहे हे निश्चितपणे एका माणसाचे काम नाही.

“राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला. अत्याचाराच्या या घटना थांबवण्यासाठी महिला अॅट्रोसिटी कायदा आणायला हवा, ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांवर अन्यायासाठी कायदा आहे, तसाच महिला अॅट्रोसिटीचा कायदा आणा, त्यासाठी कमिट्या स्थापन करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.


Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू


- Advertisement -

 

- Advertisement -