घरमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशन 2023मिठी नदीच्या मुद्द्यावरून अनिल परब आणि मंत्री उदय सामंत यांच्यात खडाजंगी

मिठी नदीच्या मुद्द्यावरून अनिल परब आणि मंत्री उदय सामंत यांच्यात खडाजंगी

Subscribe

प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आले. पण यावेळी अनिल परब यांनी उदय सामंत यांच्याकडून देण्यात आलेल्या प्रश्नावर आक्षेप घेतला. ज्यानंतर अनिल परब आणि उदय सामंत यांच्यामध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.

Maharashtra Monsoon Session 2023 : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला मागील आठवड्यात सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा सातवा दिवस असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्यासंदर्भातील, सर्वसामान्य नागरिकांच्या संदर्भातील तसेच विविध मुद्यांवरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आज (ता. 25 जुलै) विधान परिषदेत मिठी नदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित केला. गेल्या 18 वर्षांपासून मिठी नदीमधील गाळ काढण्यात येत आहे, तरी देखील सातत्याने पावसाळ्यात पूर येत असतो. तसेच नाल्यातून काढण्यात आलेल्या गाळाची आकडेवारी ही अद्यापही समोर आलेली असे एक ना अनेक प्रश्न प्रसाद लाड यांच्याकडून उपस्थित करण्यात आले.

हेही वाचा – Mumbai Police : आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची..; कंत्राटी पोलीस भरतीबाबत रोहित पवार यांना शंका

- Advertisement -

प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आले. पण यावेळी अनिल परब यांनी उदय सामंत यांच्याकडून देण्यात आलेल्या प्रश्नावर आक्षेप घेतला. ज्यानंतर अनिल परब आणि उदय सामंत यांच्यामध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. (Clash between Anil Parab and Minister Uday Samant over Mithi River issue) मिठी नदीच्या रुंदीकरणावरून व एकंदरित विविध प्रश्नांवरून मंत्री सभागृहात खोटी माहिती देत असल्याचे परबांकडून सांगण्यात आले. मंत्री खोटी माहिती घेऊन सभागृहात येतात, अशी टीका देखील अनिल परब यांनी उदय सामंत यांच्यावर केली.

अनिल परब यांनी केलेल्या टीकेवर संतापलेल्या उदय सामंत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेले पाहायला मिळाले. आम्ही कोणतीही खोटी माहिती दिली नाही. आम्हालाही सभागृहात वीस वर्षाचा अनुभव आहे. आम्हालाही सभागृहात बोलण्याचा अनुभव आहे. कोणत्या प्रश्नाला कोणत्या पद्धतीने उत्तर द्यावे याची देखील मला माहिती आहे. असे यावेळी सामंतांकडून परब यांना ठोसपणे सांगण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, प्रसाद लाड तसेच इतर आमदार सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना गाळ काढण्यावर किती खर्च झाला याबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मिठी नदीच्या विविध प्रश्नांवर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून याबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मिठी नदीच्या रुदीकरण व सौंदर्यीकरणावर 1 हजार 160 कोटी खर्च झाले. याचे कंत्राटदार कोण होते? यासाठी किती पैसे खर्च करण्यात आले? ते नेमके कुठे खर्च करण्यात आले? याबाबत उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे तपास करण्यात येईल. तसेच राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करणार असल्याचे उदय सामंत यांच्याकडून सभागृहात सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -