घरक्राइमआरपीआय आणि राष्ट्रवादीत राडा

आरपीआय आणि राष्ट्रवादीत राडा

Subscribe

राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला मारहाण

उल्हासनगर । व्हॉटसप ग्रुप चा वाद विकोपाला गेल्यावर आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये जबर हाणामारी झाल्याची घटना माजी आमदार पप्पु कलानी यांच्या बंगल्यात घडल्याने खेमानी परिसरात वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीत आरपीआयचे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 2 येथे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता कमलेश निकम आणि आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष आणि माजी उपमहापौर भगवान भालेराव यांच्यात गुरुवारी रात्री एका व्हॉटसप ग्रुप वर काही आक्षेपार्ह्य कमेंट आल्याने दोघांत वाद झाला. याच वादातून आरपीआयचे कार्यकर्ते आकाश सोनवणे, त्याचे मित्र योगेश पवार यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पप्पू कलानी यांच्या कलानी महालत शिरुन कमलेश निकम यांना मारहाण केली.
या मारहाणीत निकम यांना जबरदस्त मार लागला असून नंतर सोनवणे आणि पवार यांच्यावर देखील निकम यांच्या समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्यात सोनवणे आणि पवार गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

- Advertisement -

या मारहाणीचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. आर पी आय आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या या मारहाणीमुळे शहरात वातावरण तणावपूर्ण झाले आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाल्याची माहिती उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपागरे यांनी दिली. पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे यांनी दोन्ही गटातील व्यक्तींवर कारवाई चे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -