घरताज्या घडामोडी'मविआ'च्या मदतीने क्लीन अप चांगले केले, म्हणूनच सीबीआयला काही मिळाले नाही; नितेश...

‘मविआ’च्या मदतीने क्लीन अप चांगले केले, म्हणूनच सीबीआयला काही मिळाले नाही; नितेश राणेंचा आरोप

Subscribe

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच असल्याचे सीबीआयने आपल्या अहवालातून स्पष्ट केले. सीबीआयच्या या अहवालानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मागील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच असल्याचे सीबीआयने आपल्या अहवालातून स्पष्ट केले. सीबीआयच्या या अहवालानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मागील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “8 जूनपासून महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने ‘क्लीन अप’ इतके चांगले केले गेले की, सीबीआयला प्रवेश करेपर्यंत फारसे काही मिळवता आले नाही”, अशा शब्दांत नितेश राणेंनी ‘मविआ’वर निशाणा साधला.

दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असल्याचे सीबीआयने स्पष्ट केल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर आरोप केले. “दिशा सालियन प्रकरणी सीबीआयच्या निरीक्षणाला मी दोष देत नाही. ७२ दिवसांनी सीबीआय याप्रकरणात दाखल झाली. 8 जूनपासून महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने ‘क्लीन अप’ इतके चांगले केले गेले की, सीबीआयला प्रवेश करेपर्यंत फारसे काही मिळवता आले नाही”, अशा शब्दांत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षात दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप केले जात होते. त्यानंतर अखेर हे प्रकरणी सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर आता सीबीआयने याप्रकरणी अधिक तपास करत दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.

नेमकं काय प्रकरण?

- Advertisement -

28 वर्षीय दिशा सालियन ही मालाड येथे राहत होती. मालाड येथील गॅलेक्सी रिजंट या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन दिशा सालियन खाली कोसळली होती. यात तिचा जागीच मृत्यू झाला होती. ही घटना 8 जून आणि 9 जूनच्या मध्यरात्री 2020 साली घडली होती. महत्त्वाचे म्हणजे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी या दोन्ही मृत्यूंचा एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.


हेही वाचा – अमेरिकेच्या व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -